प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटातील आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. मोठ्या पडद्यावर आणि जाहिरातीत एकत्र काम केलेल्या या जोडीची प्रेक्षकांवर चांगलीच भूरळ आहे. याचाच फायदा घेत त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आलिया भट आणि सिध्दार्थने अलिकडेच एका शितपेयाच्या जाहिरातीचे चित्रीकरण पूर्ण केले. या जाहिरातीत ते एका प्रेमीयुगलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय लवकरच ते निर्माता करण जोहरच्या एका चित्रपटात दिसणार असल्याचे समजते. शकुन बत्रा यांचे दिग्दर्शन असलेला या चित्रपटाचे शुटिंग एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.

Story img Loader