अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न हा बी-टाऊनमधील सध्याचा सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे. दोघंही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. लग्नाच्या तारखेबाबत अद्याप संभ्रम असला तरीही आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याच्या वृत्ताला आलियाचे काका रॉबिन आणि सावत्र भाऊ राहुल भट्ट यांनी दुजोरा दिला आहे.
राहुल भट्टनं ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाच्या लग्नाबाबत रंजक खुलासे केले आहेत. तो मजेदार अंदाजात म्हणाला, ‘हो लग्न होणार आहे आणि मला निमंत्रणही आहे. मी आलियाच्या लग्नाला जाणार असलो तरीही तिथे डान्स वैगरे करणार नाही. मी पेशानं जीम इंस्ट्रक्टर आहे आणि आलियाच्या लग्नात बाउंसर म्हणून उपस्थित राहणार आहे. मी या लग्नात रक्षक असणार आहे.’
आणखी वाचा-आलिया भट्टच्या काकांनी सांगितली लग्नाची तारीख, या दिवशी घेणार रणबीरसोबत सप्तपदी
आलियानं एवढ्या कमी वयात जे यश मिळवलं आहे त्याबाबत राहुलनं प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला ‘मी खूश आहे की आलियानं एवढ्या कमी वयात हे यश मिळवलं आहे. तिचं काम खूप चांगलं आहे. ती प्रसिद्ध आहे आणि तिला खरं प्रेम मिळालं आहे जे मिळणं आजकाल फारच कठीण आहे. देव, आई-वडील, चांगलं काम आणि तिच्या निर्णयांमुळे ती आज या ठिकाणी आहे. तिनं योग्य वयात योग्य निर्णय घेतले आहेत.’
आणखी वाचा- नाना पाटेकर यांच्या ‘द कन्फेशन’चा टीझर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?
आलियानं तिच्या रिलेशनशिपबाबत तुला सांगितलं होतं का? या प्रश्नावर राहुल म्हणाला, ‘मी असा भाऊ नाहिये की अशा प्रकारच्या विषयांवर बहिणी माझ्याशी चर्चा करतील. खरं तर त्यांना भीती वाटते की मी जाऊन त्यांच्या बॉयफ्रेंडची धुलाई करेन.’ रणबीरच्या भेटीबाबत राहुल म्हणाला, ‘मी लहान असताना रणबीर भेटलो होतो. पण अलिकडच्या काळात आणि विशेष म्हणजे आलियाचा बॉयफ्रेंड म्हणून मी त्याला भेटलेलो नाही. पण आलियानं योग्य निर्णय घेतला आहे असं मला वाटतं’