बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेला तिचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट बराच गाजला. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं तुफान गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्येही दाखल झाला आहे. या चित्रपटाचं अगदी प्रेक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. त्यानंतर आता आलियाची सावत्र बहीण आणि अभिनेत्री पूजा भट्टनं या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री पूजा भट्ट म्हणाली, ‘आलियाचा हा चित्रपट मी पहिल्याच दिवशी पाहिला होता. प्रेक्षकांचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी हैराण झाले होते कारण जेव्हा तुम्ही मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहता तेव्हा प्रेक्षकांकडून तुम्हाला ओरडणं, शिट्ट्या वाजवणं अशाप्रकारच्या प्रतिसाद अपेक्षित नसतो. पण संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटानं हे सिद्ध केलं की आलिया एक उत्तम अभिनेत्री आहे. आलिया आधी एक मुलगी होती पण आता ती एक महिला आहे आणि यात ती खूपच उत्तम आहे.’ पूजा ही आलियाची सावत्र बहीण असली तरी या दोघींमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पूजानं आलियाच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं आहे.

shahid kapoor on where would be geet aditya jab we met
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
marathi actor abhijeet shwetchandra and his wife announces pregnancy
“बेबी श्वेतचंद्र Coming…”, लोकप्रिय मराठी अभिनेता होणार बाबा,…
Sky Force Box Office Collection Day 3
Sky Force च्या कमाईत मोठी वाढ, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या सिनेमाला प्रेक्षकांची मिळतेय पसंती
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
twinkle khanna on saif ali khan attack kareena kapoor
सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर करीना कपूरवर टीका करणाऱ्यांवर भडकली ट्विंकल खन्ना; म्हणाली, “पुरुषांबरोबर घडणाऱ्या प्रत्येक…”
Mayuri Deshmukh
“तर ते अत्यंत धोकादायक…”, लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख सोशल मीडियाच्या वापराबाबत म्हणाली…
Mamta Kulkarni
Maha Kumbh 2025 : ममता कुलकर्णी, अनुपम खेरनंतर ‘या’ प्रसिद्ध गायकाची महाकुंभ मेळ्याला हजेरी; शेअर केला खास Video
devmanus fame madhuri pawar shares old shocking incident
“माझ्या खांद्यावर हात टाकला…”, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत म्हणाली…
kajol on indonesian delegants kuch kuch hota hai song
इंडोनेशियन शिष्टमंडळाला ‘कुछ कुछ होता है’ गाण्याची भुरळ, राष्ट्र्रपती भवनात सादर केले शाहरुख-काजोलचे गाणे; अभिनेत्री म्हणाली…

आणखी वाचा- हृतिक- सबा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत? जवळच्या मित्रानं केला मोठा खुलासा

समीक्षक तरण आदर्श यांनी गंगूबाई काठियावाडीच्या कलेक्शनबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यांनी चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे त्यांच्या ट्वीटमध्ये दिले आहे. त्यांनी लिहिलं, ‘गंगूबाई काठियावाडीनं आज बॉक्स ऑफिसवर सेंच्युरी पूर्ण केली. लॉकडाऊन नंतर १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. याआधी सूर्यवंशी, पुष्पा हिंदी आणि ८३ या चित्रपटांनी १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.’ आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. एवढंच नाही तर समीक्षकांनीही आलिया भट्टच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. आलिया भट्टच्या अभिनयातूनच चित्रपटासाठी तिने घेतलेली मेहनत दिसून येत आहे.

आणखी वाचा- ‘झुंड’ पाहिल्यावर आमिरला अश्रू अनावर; अमिताभ बच्चन म्हणतात “तो नेहमीच अति…”

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरा येथील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला यांच्या भूमिकेत दिसत आहे.

Story img Loader