चित्रपट, लग्न अन् आता गरोदरपणामुळे आलिया भट्ट (Alia Bhatt) सतत चर्चेचा विषय ठरत आहे. खासगी तसेच तिचे प्रदर्शित झालेले चित्रपट पाहता आलियासाठी हे वर्ष लकी ठरत आहे. बॉलिवूडमधील स्टारकिड्सच्या यादीमध्ये आलियाचाही समावेश आहे. पण फक्त स्टारकिड म्हणून न मिरवता तिने उत्तमोत्तम चित्रपट करत स्वतःला सिद्ध केलं. ‘गंगुबाई’ हा चित्रपट याचंच एक उत्तम उदाहरण आहे. स्टारकिड म्हणून आलियाला अनेकदा ट्रोल केलं जातं. यावरूनच आता आलियाचा राग अनावर झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – भारतात सुपरफ्लॉप पण परदेशात ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाल, चीनमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार?

नुकतंच मिड डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियाने अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी ट्रोलिंगचा तुझ्यावर काही परिणाम होतो का असं विचारण्यात आलं. तेव्हा आलिया म्हणाली, “मला विश्वास आहे की मी माझ्या चित्रपटांद्वारेच ट्रोल करणाऱ्यांची तोंड बंद करू शकते. त्यामुळे मी ट्रोल करणाऱ्यांना प्रतिसादही देत नाही आणि त्याचं वाईटही वाटून घेत नाही. अर्थात कधीकधी मला याचं वाईट वाटतं. ‘गंगुबाई’ सारखा चित्रपट मी दिला. तेव्हा शेवटपर्यंत कोणी हसलं का?. पुढचा माझा फ्लॉप चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तरी मी हसत आहे.”

पुढे आलिया म्हणाली, “मी सतत बोलून स्वतःचा बचाव कधीच करत नाही. जर तुम्हाला मी आवडत नसेन तर माझ्याकडे दुर्लक्ष करा. मी याबाबत काहीच करू शकत नाही. मी माझ्या चित्रपटांमधूनच स्वतःला सिद्ध करेन. यामधूनच मी आता ज्या जागेवर आहे ते किती योग्य आहे हे सगळ्यांना समजेल.”

आणखी वाचा – Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ

आलियाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. आलियाने आजवर उत्तमोत्तम भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. तसेच उत्तम अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता गरोदरपणामुळे तिने आपल्या कामामधून ब्रेक घेतला आहे. पण त्यानंतर ती पुन्हा नव्या जोमाने चित्रपटांच्या कामाला सुरुवात करेल.