बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चांना उधाण आले आहे. आलिया-रणबीरने आतापर्यंत लग्न केले नसले तर सध्या तिचे फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. आलियाच्या संगीत कार्यक्रमात नाचताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या कार्यक्रमात आलिया भट्ट आणि वाणी कपूरसह अनेक सेलिब्रिटी डान्स करताना दिसत आहेत. आलियाने ‘साथिया’ चित्रपटातील ‘छलका छलका रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टग्रामवर शेअर केला आहे.

काल रात्री अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांच्या संगीत कार्यक्रम सोहळा पार पडला होता. या सोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. आलियाने या ठिकाणी हजेरी लावली. अनुष्का आणि आदित्य हे एकमेकांना बऱ्याच काळपासून डेट करत आहे. आज २१ नोव्हेंबरला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूडमध्ये लगीनघाई

आलिया आणि रणबीर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्यांनी काही कारणात्सव हे लग्न पुढे ढकलले आहे. आलिया-रणबीर हे येत्या डिसेंबरमध्ये लग्न करु शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबतही कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया ही ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटींग अद्याप बाकी आहे. तर रणबीर हा सध्या ‘शमशेरा’, ‘ऐनिमल’ या सारख्या चित्रपटात व्यस्त आहे.

Story img Loader