फॉल विंटर कलेक्शनद्वारे आपल्यातील फॅशन डिझायनरची चुणूक दाखविणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला तिची मैत्रिण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रासाठी ड्रेस डिझाईन करण्याची इच्छा आहे. ‘स्टुडन्ट ऑफ दी इयर’, ‘हायवे’, ‘टू स्टेटस्’ आणि ‘हंम्टी शर्मा की दुल्हनिया’सारख्या चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या आलिया भटने फॅशन पोर्टल ‘जबाँग डॉट कॉम’सह ‘कॅप्सूल कलेक्शन’ डिझाईन करण्यासाठी करार केला आहे. तुला कोणासाठी कपडे डिझाईन करण्याची इच्छा आहे असा प्रश्न विचारला असता, आलियाने परिणिती चोप्रासाठी कपडे डिझाईन करण्याची इच्छा व्यक्त केली. फॉल विंटर कलेक्शनविषयी बोलताना ती म्हणाली, मी डिझाईन केलेले कपडे प्रत्येक वर्गातल्या मुलींसाठी आहेत. २५ ते ३५ वयापर्यंतच्या स्त्रिया मी डिझाईन केलेले कपडे परिधान करू शकतात. या कलेक्शनमध्ये साधेपणा असून, यात माझे व्यक्तिमत्व प्रतित व्हावे अशी माझी इच्छा होती. हे फॉल विंटर कलेक्शन डिझाईन करताना आम्ही खूप चर्चा केली. त्यामुळेच यात जास्त स्वेट शर्ट आहेत. माझ्यासाठी व्यक्तिगत आणि खास असलेल्या या गोष्टीचा अनेकांनी आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मला प्राणी आवडत असल्याने मोठ्या प्रमाणावर अॅनिमल प्रिंटचा वापर करण्यात आला आहे.

Story img Loader