बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. आलिया लवकरच आपल्याला दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशा या चित्रपटात आलिया सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आलियाची ही भूमिका खूप छोटी असल्याचे म्हटले जाते. तरी देखील या भूमिकेसाठी आलिया कोटींची रक्कम घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात आलियाची फक्त १५ मिनिटांची भूमिका आहे. हा आलियाचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. अनेकांना वाटतं होतं की आलिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल प्रेक्षकांना वाटले होते. पण या चित्रपटात तिची अशी काही भूमिका नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा : आमिरसोबत लग्नाच्या चर्चांवर अखेर फातिमाने सोडलं मौन म्हणाली…
दरम्यान, आलियाने फ्कत १० दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण केले. आलियाने या चित्रपटात राम चरणची पत्नी अल्लुरी सीताची भूमिका साकारली आहे. ही भूमिका एवढी मोठी नसली तरी देखील आलियाला मोठी रक्कम मिळाली आहे. राम चरणसोबत काम करण्यासाठी आलियाने ६ कोटी रुपयाची मागणी केली होती. दाक्षिणात्य अभिनेत्रीला मुख्य भूमिका साकारण्यासाठी ही इतके मानधन दिले जात नाही. तरी देखील आलियाची ही मागणी पूर्ण करण्यात आली असून तिला ६ कोटी रुपये देण्यात आले, असे म्हटले जाते.
आणखी वाचा : “…म्हणून मला माझे दागिने विकावे लागणार”, किरण खेर यांनी केले वक्तव्य
आरआरआर या चित्रपटात राम चरण, ज्यूनियर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट दिसणार आहे. हा चित्रपट ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. फक्त आलिया नाही तर अजय देवगणचा ही हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे.