रणबीर कपूरची आई म्हणजेच अभिनेत्री नीतू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावरून नीतू कपूर यांना अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर नीतू कपूर यांच्या लाडक्या सुनेने म्हणजेच अभिनेत्री आलिया भट्टने एक खास फोटो शेअर करत नीतू कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आलिया भट्टने तिच्या हळदी समारंभातील एक खास फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत तिने नीतू कपूर यांच्यासाठी खास बर्थ डे मेसेजही लिहिलाय. या फोटोत आलिया आणि नीतू कपूर दोघींनी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं दिसतंय. आलियाच्या गालाला हळद लागली आहे. तर नीतू कपूर यांच्या हातात मिठाईची थाळी असून त्या आलियाच्या कपाळाचं चुंबन घेताना दिसताय.

फोटो शेअर करत आलियाने मेसेजमध्ये लिहलंय,”सर्वात सुंदर मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी सासू, मैत्रीण आणि लवकरच होणाऱ्या आजीला खूप सारं प्रेम” अशा आशयाचा मेसेज तिने या फोटोसोबत शेअर केलाय.

पहिली पत्नी कोण?, कोणता आहे आजार?; रणबीर कपूरबद्दल गुगलवर सर्च होतायत ‘या’ चार गोष्टी

(Photo: Alia Bhatt/ Instagram)

दरम्यान नीतू कपूर कुटुंबियांसोबत त्यांचा वाढदिवस लंडनमध्ये सेलिब्रेट करत आहेत. रणबीरच्या बहिणीने म्हणजेच रिद्धीमाने नीतू यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही क्षण शेअर केले आहेत. ‘हैपिएस्ट बर्थडे लाइफलाइन’ असं म्हणत रिद्धीमानेही आईला शुभेच्छा दिल्या आहेत.


नीतू कपूर यांनी नुकतच ‘जुग जुग जियो’ या सिनेमातून बऱ्याच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केलंय. या सिनेमात वरुण धवन आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader