बॉलिवूडची डार्लिंग आलिया भट्ट सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. गरोदर असूनही आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. आलिया आणि रणबीरच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याचे आगमन कधी होणार याबाबत त्यांचे चाहते उत्सुक आहेत. याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीरच्या घरी डिसेंबर महिन्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होईल असं म्हटलं जातंय. कपूर कुटुंब यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आलियाला, ‘तुला मुलगा हवा आहे की मुलगी?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आलियाने, “होणारे बाळ स्वस्थ असावे” असे उत्तर दिले.
आणखी वाचा – “मी १०० वर्षांची होईपर्यंत काम करेन…” गरदोरपणाबद्दलच्या प्रश्नावर आलिया भट्टचे सडेतोड उत्तर
याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार बाळाच्या जन्माआधी रणबीर आणि आलिया आवश्यक ती सर्व काळजी घेत असून त्यांनी डिलिव्हरीसाठी रुग्णालयाचं बुकिंग केल्याचंही बोललं जातंय. मात्र आलिया कोणत्या रुग्णालयात बाळाला जन्म देणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
आणखी वाचा – प्रियांका, आलिया आणि कतरिनासोबत ‘जी ले जरा’मध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता; चर्चांना उधाण
दरम्यान आलिया भट्टचा ‘डार्लिंग्ज’ चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणबीर कपूरसोबत हा आलियाचा पहिला चित्रपट असणार आहे. तसेच आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.