अभिनेत्री नीतू कपूर यांचं कुटुंब म्हणजे बॉलिवूडमधील बहुचर्चित कुटुंबापैकी एक. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा विवाहसोहळा तर टॉक ऑफ द टाऊन ठरला. आता तर आलिया गरोदर असल्याची बातमी ऐकून कपूर कुटुंबिय आनंदात आहेत. नीतू कपूर यांनी देखील आपण आजी होणार म्हटल्यावर आपला आनंद व्यक्त केला. ८ जूलै रोजी नीतू यांचा वाढदिवस होता. कलाविश्वातील अनेक मंडळींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आलियाने देखील सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Photos : ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीचं खऱ्या आयुष्यातील सुखी कुटुंब, लेकीवर जीवापाड प्रेम

इतकंच नव्हे तर वाढदिवसानिमित्ता आलियाने नीतू कपूर यांना खास भेटवस्तू देत सरप्राईज दिलं. नीतू यांनी याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. आलियाने नीतू यांच्या वाढदिवसानिमित्त पांढऱ्या रंगाचा फुलांचा गुच्छ दिला. हे पाहून नीतू यांना अगदी आनंद झाला. आलियाने दिलेल्या फुलांच्या गुच्छाचा फोटो शेअर करत त्या म्हणाल्या, “धन्यवाद आलिया”. सूनेनं दिलेलं सरप्राईज गिफ्ट पाहून नीतू कपूर भारावून गेल्या.

नीतू आणि आलिया यांच्यामध्ये सासू-सूनपेक्षा मैत्रीचं घट्ट नातं आहे. हे त्यांच्या प्रत्येक व्हिडीओ, फोटोंमधून लक्षात येतंच. शिवाय सोशल मीडियाद्वारे दोघीही एकमेकांवरील प्रेम आणि दोघींमध्ये असलेल्या नात्याबाबत व्यक्त होताना दिसतात. नीतू यांच्याबरोबरचा सुंदर फोटो शेअर करत आलियाने त्यांना हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

नीतू यांनी यंदाचा त्यांचा वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. लेक रिद्धीमाला भेटायला त्या लंडनला गेल्या आहेत. नीतू यांनी रिद्धीमा, तिचा लेक आणि पतीसोबत वाढदिवस साजरा केला. कुटुंबियांबरोबर वाढदिवस साजरा करताना नीतू कपूर फार खूश होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia gifted special flower bouquet to mother in law neetu kapoor on her birthday actress share photo on instagram kmd