बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचीच चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे. आलियाच्या मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. अशात आता आलिया आणि रणबीर यांचे काही जुने व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ज्यात भर मंचावरील आलियाचं रणबीरसोबतचं वागणं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आलिया आणि रणबीर एका मंचावर उभे असलेले दिसत आहेत. यावेळी आलिया तिच्या ड्रेसला असलेलं काही वेस्ट मटेरिअल काढताना दिसते. अशातच रणबीरचं तिच्याकडे लक्ष जातं आणि तो तिच्या हातातलं वेस्ट मटेरिलअल घेण्यासाठी हात पुढे करतो. आलिया ते त्याच्याकडे देते आणि रणबीर ते वेस्ट मटेरिअल आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो. आलिया रणबीरच्या लग्नाच्या अगोदर या दोघांचा हा क्यूट व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

याशिवाय इतरही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात आलिया आणि रणबीर यांच्यातील क्यूट केमिस्ट्री सर्वांसमोर आली होती. आलियाने तर सर्वांसमोर रणबीरवरील प्रेमाची उघड कबुली दिली होती.

दरम्यान ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या विधी १४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सुरु होतील. यानंतर संध्याकाळपर्यंत रणबीर आणि आलिया सप्तपदी घेणार आहेत. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट, मिकी कॉन्ट्रॅक्टर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. मिकी कॉन्ट्रॅक्टरने आतापर्यंत शिल्पा शेट्टी, काजोल आणि प्रियांका चोप्रासह अनेक सेलिब्रिटींना स्टाइल केले आहे. आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नात प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीचे पोशाख घालणार आहेत.

Story img Loader