आलिया आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या विवाहसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय आणि काही मोजके नातेवाईक तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या सर्व विधी पंजाबी रितीरिवाजा प्रमाणे पार पडल्या. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आलियाच्या वेडिंग लुकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तिचे लग्नाचे आउटफिट्स प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केले होते. पण आता अशी चर्चा आहे की आलियानं लग्नात अभिनेत्री कंगना रणौतचा लुक कॉपी केला आहे.
सोशल मीडियावर कंगना आणि आलियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आलियाचा वेडिंग लुक इतर अभिनेत्रींच्या तुलनेत खूपच वेगळा होता. आलियानं तिच्या लग्नासाठी आयव्हरी रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. तिची ही साडी प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केली होती. मात्र त्याच्याकडून छोटीशी चूक झाल्याचं बोललं जातंय.
आणखी वाचा- लग्नानंतर आलियानं शेअर केले रोमँटिक फोटो, रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडची कमेंट चर्चेत
डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केलेला आलिया भट्टचा लुक हा कंगना रणौतच्या लुकशी खूपच मिळता-जुळता आहे. कंगनानं देखील जवळपास त्याच रंगाची आणि डिझाइनची साडी भाऊ अक्षित रणौतच्या लग्नात परिधान केली होती. विशेष म्हणजे कंगनाची ही साडी देखील सब्यासाचीनंच डिझाइन केली होती. कंगनाच्या भावाचं लग्न नोव्हेंबर २०२० मध्ये झालं होतं. त्यावेळी कंगनानं आपल्या पोस्टमध्ये सब्यासाचीला टॅगही केलं होतं. भावाच्या रिसेप्शनला ही साडी परिधान करताना कंगनानं त्याला पहाडी लुकचा टच दिला होता. आता एका युजरनं आलिया आणि कंगनाचा हा लुक कंपेअर करत एक फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा- रणबीर कपूरच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणनं अखेर सोडलं मौन, प्रतिक्रिया चर्चेत
दरम्यान आलियाच्या लग्नानंतर कंगनाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आलियानं कंगनाचा लुक कॉपी केल्याचं काही युजरनी म्हटलं आहे. मात्र आलियाच्या वेडिंग लुक बद्दल बोलायचं तर ती या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर आलिया- रणबीरच्या लग्नाचे फोटो सर्वाधिक चर्चेत आहेत. रणबीरनंही आलियाच्या लुकला मॅचिंग आयव्हरी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. या लुकमधील दोघांचाही रॉयल अंदाज सर्वांच लक्ष वेधून घेताना दिसत आहे.