अनेकांना उत्सुकता लागून राहिलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्यानिमित्ताने आलिया भट पहिल्यांदाच एका बिहारी मुलीची भूमिका साकारत आहे. यापूर्वीच्या चित्रपटांमधून आलिया ग्लॅमरस आणि शहरी व्यक्तिरेखा साकारताना दिसली होती. मात्र, ‘उडता पंजाब’मध्ये तिने साकारलेली स्थलांतरीत बिहारी मुलीची भूमिका प्रेक्षकांसाठी नवा अनुभव असेल. आलियाने तिचा फर्स्ट लूक नुकताच ट्विटरवर शेअर केला असून यामध्ये आलिया जखमी अवस्थेत धावताना दिसत आहे. याशिवाय, आलियाने चित्रपटातील  बिहारी भाषेतील तिचा एक संवादही ट्विटरवर शेअर केला आहे. आलियाचा हा बिहारी अंदाज आता प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल. अभिषेक चौबे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, १७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आलियासोबत या चित्रपटामध्ये शाहीद कपूर, करिना कपूर, प्रभज्योत सिंग, पंजाबमधील चित्रपटांचे अभिनेते दिलजीत दोसांझ हे सुद्धा दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा