चित्रपटसृष्टीत असे बरेच सेलिब्रिटी आहेत जे जाणूनबुजून किंवा नकळत वादात सापडतात. काही सेलिब्रिटी वादात अडकून प्रसिद्धी मिळवतात तर काहींचे करिअर त्यामुळे उद्ध्वस्त होते. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत. ज्यामुळे त्यांचे करिअर उद्धवस्त झाले होते. आज आपण अभिनेत्री अलीशा खानबद्दल जाणून घेणार आहोत.
अभिनेत्री अलीशा खान एका एमएमएस कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आली होती. अलीसाच्या बॉयफ्रेंडने तिचा एक खाजगी व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला होता. पण अलीशाने हार मानली नाही. तिने बॉयफ्रेंडविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला. अपमानाच्या भीतीने तिच्या कुटुंबीयांनी तिला तसे करू नकोस असे सांगितले. पण जेव्हा अलीशा कोणाचेही न ऐकता पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेली तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिला घराबाहेर हाकलून दिले.
या घटनेनंतर अलीशाला राहण्यासाठी जागा नव्हती. ती रस्त्यावर फिरायची, आश्रमांमध्ये राहायची कसेबसे ती दिवस काढत होती, याचा खुलासा अलीशाने एका मुलाखतीत केला होता. चित्रपटसृष्टीपासून लांब असलेली अलीशा खानने पत्रकार वसीम अख्तरशी लग्न केले आहे. वसीम आणि अलीशाची ओळख पत्रकार परिषदेत झाली होती. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले.
आणखी वाचा : साराने केले गुपचूप लग्न? अखेर व्हायरल फोटोमागील सत्य आले समोर
अलीशाने सतत १२ सुपरहिट म्युजिक व्हिडीओ केल्यानंतर, तिला बॉलिवूडमध्ये अनेक ऑफर मिळू लागल्या होत्या. अलीशाने २०१० मध्ये ‘माय हसबॅंड्स वाइफ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अलीशाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अलीशाने अभिनेता इमरान हाश्मीसोबत ‘आइना’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट तर प्रदर्शित झाला नाही.