काही धक्के पचवायची तयारी असेल तरच चित्रपटाच्या जगात भटकंती करावी व भेटी-गाठी घ्याव्यात…
रडूबाई प्रतिमेची धो धो लोकप्रियता मिळवणारी अलका आठल्ये आता त्या वाटेला जाणार नाही.
केदार शिंदे याने ‘श्रीमंत दामोदर पंत’ या चित्रपटासाठी तिच्या प्रतिमेपेक्षा वेगळी म्हणजे धमाल भूमिका देण्याचे धाडस केले आहे.
अलकास याबाबत छेडले असता ती म्हणाली, अरे, ‘लेक चालली सासरला’ आणि ‘माहेरची साडी’ केवढे तरी यशस्वी ठरल्याने माला सोशिक नायिका अशी प्रतिमा चिकटली. ग्रामीण भागातील जनतेने माझ्या त्या प्रतिमेवर आणि माझ्यावर प्रचंड प्रेम केले. अधेमधे मी काही वेगळ्या भूमिका केल्या, पण ते चित्रपट व्यवस्थित झळकले माहीत. यावेळी मात्र माझे नवेरूप लोकप्रिय होईल याचा विश्वास आहे.
अलका रडणार नाही
काही धक्के पचवायची तयारी अशेल तरच चित्रपटाच्या जगात भटकंती करावी व भेटी-गाठी घ्याव्यात... रडूबाई प्रतिमेची धो धो लोकप्रियता मिळवणारी अलका आठल्ये आता त्या वाटेला जाणार नाही.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 08-07-2013 at 02:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alka athalye plays comic role in shrimant damodar pant