नुकताच चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणा-या जॉनने १०० कोटी कमवणारे सर्वच चित्रपट चांगले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. जॉनच्या जेए एन्टरटेमेंटची निर्मिती असलेल्या ‘विकी डोनर’ चित्रपटच्या यशानंतर तो रायसिंग सन फिल्मससोबत संयुक्तपणे ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘मद्रास कॅफे’च्या ट्रेलरचे अनावरण गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी जॉन म्हणाला की, हा एक गंभीर विषयावरील चित्रपट आहे. मी चांगले चित्रपट बनवण्यावर विश्वास ठेवतो. तसेच, ‘मद्रास कॅफे’ करोडो रुपये कमवेल का हे सांगता येत नाही. पण, बॉक्स ऑफीसवर १०० कोटी कमवणारे सर्वच चित्रपट चांगले नव्हते.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येशी संबंधित काही दृश्ये चित्रपटात असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीलंकेच्या भारत आणि श्रीलंका यांच्या राजनैतिक संबंधावर आधारित असलेला गुप्तहेर रोमांचकारी चित्रपट मद्रास कॅफे २३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader