ऊर्मिला मातोंडकरच्या यशस्वी कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली..राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द्रोही’. ‘रंगीला’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘सत्या’, ‘कौन’ ‘दौड’ ही नावेच तिच्या विविधतेचा छानसा प्रत्यय देतात. त्याशिवाय ‘एक हसीना थी’, ‘जुदाई’, ‘पिंजर’ अशाही काही चित्रपटांतूनही तिने अष्टपैलुत्व दाखविले. अशा गुणी अभिनेत्रीचे मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दर्शन घडावे असे बराच काळ वाटत होते ना? तो योग सुजय डहाके दिग्दर्शित ‘आजोबा’ चित्रपटाद्वारे आला आहे.
तसे तिला आपण फार पूर्वी बालकलाकार म्हणून ‘संसार’, ‘झाकोळ’ अशा चित्रपटांतून पाहिले. वर्षभरापूर्वी ‘हृदयनाथ’ चित्रपटात तिचे नृत्यदेखील पाहिले, पण मराठीत एखाद्या वेगळ्या मराठी चित्रपटातून भूमिका साकारण्याची तिची इच्छा ‘आजोबा’ पूर्ण करील, असे दिसते. कारण ‘शाळा’ चित्रपटामुळे सुजय डहाकेच्या दिग्दर्शनाबाबत प्रचंड विश्वास वाढीला लागला आहे.. आणि ऊर्मिलाला अशाच उत्तम दिग्दर्शकाची नेहमीच कदर असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा