All We Imagine As Light : अभिनेत्री दिव्या प्रभाने पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’मध्ये एका तरुण मल्याळी नर्स अनुची भूमिका साकारली आहे. तिने एका मुलाखतीत याच सिनेमातील एका नग्न दृश्यावर भाष्य केले आहे. या सिनेमातील नग्न दृश्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यानंतर दिव्या प्रभाने याचा निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ऑनमनोरमा’ला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने सांगितले की, प्रसिद्धीसाठी तिला नग्न दृश्यांची अजिबात गरज नाहीये. दिव्या प्रभा सध्या दुबईत दिग्दर्शक थमर केव्ही यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या सेटवर असतानाच, तिने या विषयावर ‘ऑनमनोरमा’ला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “हे खूप दुर्दैवी आहे, मात्र ही भूमिका स्वीकारताना केरळमधील काही लोकांकडून अशी प्रतिक्रिया येईल, याची मला आधीच कल्पना होती. आपण यॉर्गोस लंथिमोससारख्या दिग्दर्शकांचे आणि ऑस्कर जिंकणाऱ्या अभिनेत्रींचे कौतुक करतो, पण मल्याळी महिलांनी अशा भूमिका केल्यावर असहिष्णुता दाखवतो. तरी काही पुरुषांनी याला विरोध केला, हे पाहून आनंद झाला.”

हेही वाचा…Video : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? अभिनेत्याने मुंबईकरांशी साधला मराठीत संवाद, म्हणाला…

दिव्या प्रभाने (Divya Prabha) नमूद केले की, ” जे व्हिडीओ लीक करून शेअर करतात, ते लोक समाजातील फक्त १० टक्के आहेत, त्यांची मानसिकता मला समजत नाही. एक अभिनेत्री म्हणून मी जेव्हा स्क्रिप्ट निवडते, तेव्हा ती मला पटली पाहिजे आणि ‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’मधील माझ्या भूमिकेबद्दल मी ठाम होते. काहींनी माझ्यावर टीका केली की प्रसिद्धीसाठी मी न्यूड दृश्य (Nude Scene) केलं, पण मी यापूर्वीही अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे, त्यामुळे प्रसिद्धीसाठी मला नग्न होण्याची गरज नाही,” असे दिव्या प्रभा म्हणाली.

हेही वाचा…जान्हवी कपूर मासिक पाळीदरम्यान प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडबरोबर करायची ब्रेकअप; म्हणाली, “एकदा माझं…”

‘ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाइट’ यंदा कान्स (Cannes) फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. दिव्या प्रभाबरोबरच या चित्रपटात कानी कुसरुती, छाया कदम आणि यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All we imagine as light actress divya prabha responds to nude leaked scene from movie also slam those who did this psg