Adipurush Controversy : ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सुरुवात धडाक्यात केली खरी परंतु यातील संवाद आणि अनेक प्रसंगांमुळे चित्रपट ट्रोल होऊ लागला. तसेच प्रेक्षकांनीही या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. चित्रपटातील कलाकारांच्या संवादांवरुन आणि पोशाखांवरुन मोठा वाद सुरू आहे. हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात यावरील सुनावणी आज (२७ जून) पार पडली. यावेळी खंडपीठाने या चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांना आक्षेपार्ह संवाद लिहिल्याबद्दल तर निर्मात्यांना वादग्रस्त दृश्य चित्रित केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे.

आदिपुरूष चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद आणि पात्रांचे पोशाख याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी सीबीएफसी म्हणजेच सेन्सॉर बोर्डालाही फटकारलं. “सेन्सॉर बोर्डाकडून न्यायालयात उपस्थित असलेल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांना विचारण्यात आलं की, या चित्रपाटील आक्षेपार्ह दृश्य, कपडे आणि सीन्सद्वारे काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं म्हटलं जातं की, या धर्माचे लोक खूपच सहिष्णू आहेत. मग तुम्ही त्यांची कसोटी पाहणार का? ही त्यांच्या सहनशीलतेची परीक्षा आहे का? ही काही प्रोपगंडाअंतर्गत दाखल केलेली याचिका नाही. आम्ही जर याकडे डोळेझाक केली तर तुम्ही त्यांची कसोटी पहणार का?”

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Ramsar sites Maharashtra
राज्यातील रामसर स्थळांचे संरक्षण न्यायालयाच्या देखरेखीखाली, न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल

उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे की, “सेन्सॉर बोर्डाने त्यांची जबाबदारी पार पाडली आहे का? ज्या धर्माबद्दल हा चित्रपट आहे, नशीब त्या धर्माच्या लोकांनी कोणताही वाद निर्माण केला नाही, ही चांगली गोष्ट असली तरी भगवान राम, हनुमान आणि सीता मातेला अशा प्रकारे सादर करणं चुकीचं आहे.”

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने म्हटलं आहे की, आदिपुरूष या चित्रपटात सीता माता, हनुमान आणि इतर पौराणिक पात्रांचं जे चित्रण केलंय ते आक्षेपार्ह आहे. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि संवाद लेखकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डाला प्रश्न विचारला आहे की, त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी काय पावलं उचलली होती?

“किमान रामायण, कुराणसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा”

या सिनेमाच्या विरोधात वकील कुलदीप तिवारी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात याचिका दाखल केली होती. याविषयीची सुनावणी आज झाली त्यात कोर्टाने आदिपुरुषच्या निर्मात्यांना आणि सेन्सॉर बोर्डाला फटकारलं आहे. कोर्टाने काल (सोमवार, २६ जून) झालेल्या सुनावणीवेळी म्हटलं की, सिनेमा हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही काय शिकवणार आहात? सेन्सॉर बोर्डाला त्यांची जबाबदारी समजत नाही का? कोर्टाने हे देखील म्हटलं आहे की रामायण, कुराण, गुरु ग्रंथसाहेब, भगवद्गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाना तरी सोडा.

हे ही वाचा >> “मी दाऊद इब्राहिमच्या…”, NIA चौकशीदरम्यान डी-कंपनीचा उल्लेख करत लॉरेन्स बिश्नोईचा मोठा खुलासा; म्हणाला…

या चित्रपटात रावण वटवाघुळाला मांस खाऊ घालताना दाखवला आहे, सीतेला स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये दाखवलं गेलं आहे, वटवाघुळ हेच रावणाचं विमान/वाहन दाखवलं आहे, काळ्या रंगाची लंका, सुषैण वैद्याचा उल्लेख न करणं, त्यऐवजी बिभीषणाच्या पत्नीने लक्ष्मणाला संजीवनी देऊन त्याच्यावर उपचार करणं अशा आक्षेपार्ह प्रसंगांवरही न्यायालयाने आक्षेप घेतला आहे.

Story img Loader