Pushpa 2 Stampede Case : ‘पुष्पा २: द रूल’ या चित्रपटाच्या हैदराबादमधील प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला (Allu Arjun) अटक करण्यात आली होती. याच प्रकरणावर तेलंगणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात अल्लू अर्जुनच्या वकिलांनी शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाचे उदाहरण दिले.

४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री अल्लू अर्जुन हैदराबादमधील संध्या चित्रपटगृहात ‘पुष्पा २’ (Pushpa 2) च्या स्पेशल शोसाठी आला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर चाहत्यांचा मोठा जमावही थिएटरच्या गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. याचवेळी येथे चेंगराचेंगरीमध्ये ३९ वर्षी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला.

man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Dabholkar murder case Objection to Dabholkar familys appeal against release of accused
दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपींच्या सुटकेविरोधातील दाभोलकर कुटुंबीयांच्या अपिलाला आक्षेप
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”

पोलीस स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) यांनी थिएटर व्यवस्थापनाला या प्रीमियर शोसाठी कमिशनरकडून परवानगी घ्यायला सांगितले होते. तसेच, एसएचओने अभिनेत्याला ‘पुष्पा २’ च्या विशेष शोसाठी उपस्थित राहू नये, असे सांगण्याचेही थिएटरला सूचित केले होते,” असे सरकारी वकिलांनी सांगितले.

अल्लू अर्जुनच्या वकिलांचा युक्तिवाद

अल्लू अर्जुनच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की ‘पुष्पा २’ च्या शोसाठी पोलिसांच्या सूचना स्पष्ट नव्हत्या. “पोलिसांनी अभिनेत्याच्या (अल्लू अर्जुनच्या) उपस्थितीमुळे मृत्यू होईल, असे कधीही स्पष्ट केले नव्हते. पहिल्या शोला उपस्थित राहणे ही सर्वसामान्य घटना आहे,” असे अल्लू अर्जुनच्या वकिलांनी नमूद केले.

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटकेवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हस्तक्षेप करणार नाही…”

शाहरुख खानच्या प्रकरणाचा उल्लेख

अल्लू अर्जुनच्या वकिलांनी न्यायालयात शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चेंगराचेंगरीच्या प्रकरणाचा दाखला दिला. वकिलांनी सांगितले की, ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहरुख खानला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, गुजरात उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शाहरुख खानला निर्दोष घोषित केले.

अल्लू अर्जुनच्या वकिलांनी सांगितले की अभिनेता फक्त चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होता. “आरोप असा आहे की चेंगराचेंगरी चित्रपटगृहाच्या खालच्या भागात झाली, जिथे पीडित अडकले होते. त्यावेळी माझा क्लायंट पहिल्या मजल्यावर होता आणि फक्त चित्रपट पाहत होता. पोलीस आणि थिएटर व्यवस्थापनानेही त्याला शोसाठी उपस्थित राहू नये, असे सांगितले नव्हते,” असे अल्लू अर्जुनच्या वकिलांनी म्हटले.

हेही वाचा…रश्मिका मंदानाची अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “एकाच व्यक्तीवर सर्व दोषारोप…”

नेमके प्रकरण काय ?

४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अल्लू अर्जुन त्याच्या खासगी सुरक्षा रक्षकांसमवेत संध्या थिएटरवर आला. त्यावेळी त्याच्याबरोबर चाहत्यांचा मोठा जमावही थिएटरच्या गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. अल्लू अर्जुनच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी जमावाला दूर लोटण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. यानंतर उसळलेल्या चेंगराचेंगरीमध्ये ३९ वर्षी एम. रेवती नावाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेवती यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा मोठा चाहता असल्यामुळे ते सहकुटुंब ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आले होते. अल्लू अर्जुनवर भारतीय न्याय संहिता (भारतीय दंड संहिता) च्या कलम १०५ (जीवघेणे कृत्य) आणि कलम ११८ (जाणूनबुजून इतरांना इजा पोहोचवणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader