अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे. पण चित्रपट रिलीज होऊन काही दिवसच उलटत नाहीत तोपर्यंत यातील एक सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एवढंच नाही तर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनीही या सीनला विरोध केला आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा सीन चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यात एक रोमँटिक सीन चित्रित करण्यात आला आहे. हा सीन जास्तच बोल्ड असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर या सीनबाबत आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहता निर्मात्यांनी हा सीन चित्रपटातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा तो बोल्ड सीन दिसणार नाही.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

१७ डिसेंबरला रिलीज झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. पण या चित्रपटातील एका सीनवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. या सीनमध्ये अल्लू अर्जुन रश्मिकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. रश्मिकानं या चित्रपटात ‘श्रीवल्ली’ची भूमिका साकारली आहे. ती पुष्पा राजच्या म्हणजे अल्लू अर्जुनच्या प्रेमात पडते. त्यानंतर एका सीनमध्ये हे दोघंही एकत्र दाखवण्यात आले आहेत. दोघं एकत्र असताना पुष्पा श्रीवल्लीच्या ब्रेस्टला स्पर्श करतो म्हणून ती त्याच्यावर चिडते. यावर तो तिला म्हणतो, ‘एका हातात फोन होता त्यामुळे दुसरा हात कुठे गेला हे लक्षात आलं नाही.’

मिळालेल्या माहितीनुसार, तेलुगू प्रेक्षकांना हा सीन अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर या सीनबाबत नकारात्मक बोललं जात आहे. चित्रपटाच्या नायकाचं सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे वर्तन करणं प्रेक्षकांच्या दृष्टीने चुकीचं आहे. त्यामुळे चित्रपटातून हा सीन वगळण्याची मागणी प्रेक्षकांनी केली आहे आणि प्रेक्षकांच्या मागणीनंतर निर्मात्यांनीही चित्रपटातून हा सीन हटवल्याची माहिती मिळत आहे.

Story img Loader