Pushpa 2 The Rule New Release Date: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुन, फहाद फासिल व रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण अधिकृतरित्या याबाबत घोषणा झाली नव्हती. अखेर, काल १७ जूनला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटासाठी प्रेक्षकांनी दोन महिने नव्हेतर सहा महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाच्या टीझर, गाणी सुपरहिट झाली आहेत. विशेष म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’मधील ‘पुष्पा-पुष्पा’ आणि ‘अंगारों’ या दोन गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. प्रत्येकाच्या ओठांवर सध्या ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटातील गाणी आहेत. पण अशातच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याची मोठी घोषणा केली आहे. यामागचं कारण १५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचं क्लॅश नसून काहीस वेगळं आहे.
‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर प्रदर्शनाच्या नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनचा नवा लूकचा पोस्टर शेअर करून लिहिलं आहे, “तुम्हाला सर्वोत्कृष्ट देण्याचा आमचा मानस आहे. आतुरता वाढली आहे काही चांगला अनुभव घेण्यासाठी जो तुम्हाला चित्रपटगृहात मिळेल. आता जगभरात ‘पुष्पा २ : द रुल’चं ग्रँड प्रदर्शन ६ डिसेंबर २०२४ला होणार आहे. त्याचे शासन अदभुत असेल, त्याचे शासन अभूतपूर्व असेल.”
We intend to give you the best ?
— Pushpa (@PushpaMovie) June 17, 2024
The wait increases for a memorable experience on the big screens.#Pushpa2TheRule Grand release worldwide on 6th DECEMBER 2024 ??
His rule will be phenomenal. His rule will be unprecedented ❤️?
Icon Star @alluarjun @iamRashmika @aryasukku… pic.twitter.com/3JYxXd2YgF
माहितीनुसार, ६ डिसेंबरला ‘पुष्पा २ : द रुल’ आणि विकी कौशल, रश्मिका मंदाना अभिनीत ‘छावा’ चित्रपटाची टक्कर होऊ शकते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधरित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आहे. पण आता ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.