२०२१ या वर्षी केवळ एकाच चित्रपटाने सारं बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं, तो चित्रपट म्हणजे ‘पुष्पा’. ओटीटीवर प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवर लोकांनी या चित्रपटासाठी तोबा गर्दी केली. चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली, त्यावर कित्येक रील आणि मीम्स व्हायरल झाले. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहादचा अभिनय सगळंच लोकांना प्रचंड आवडलं आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागासाठी आस लावून बसले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : “प्रवास अजूनही सुरुच आहे…”, ‘सॅम बहादुर’च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल भावूक

प्रेक्षकही चांगलेच उत्सुक झाले होते. आता त्यांच्या उत्सुकतेत आणखीन भर पडणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ‘पुष्पा द रूल’ या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचे समोर आले आहे. Mythri Movie Makers च्या इस्टाग्राम अकाउंटवरून नुकताच ‘पुष्पा द रुल’च्या सेटवरील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपटाची टिम मन लावून काम करत असल्याचे दिसत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदानाने यावेळचा एक फोटो ट्विटरवर फोटो शेअर करत शूटिंग सुरु झाल्याची माहिती दिली. तिने लिहिले, “ते बघा…चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे…” ही पोस्ट शेअर करताना ती खूप उत्सुक असल्याचे दिसते.

हेही वाचा : ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका

गेल्या वर्षी १७ डिसेंबरला ‘पुष्पा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसले. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. हा चित्रपट मूळतः तेलुगुमध्ये शूट करण्यात आला होता आणि नंतर तो हिंदीसह इतर भाषांमध्ये डब करण्यात आला होता. ‘पुष्पा’ ने जगभरात ३५० कोटींहून अधिक कलेक्शन केले. त्यापाठोपाठ ‘पुष्पा २’ चित्रपटाचे बजेट ४५० कोटी असल्याचे सांगितले जात आहे

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun and rashmika mandanna started shooting for pushpa 2 rnv