दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ बराच गाजला. या चित्रपटानं अल्लू अर्जुनला बरीच लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. पण आता पुष्पानं खऱ्या आयुष्यातही काही निमय मोडले आहेत. काही रिपोर्ट्सच्या माहितीप्रमाणे अल्लू अर्जुननं नुकतच वाहतुकीचे नियम मोडले आहेत. त्यानंतर त्याला हैदराबाद पोलिसांनी त्याला पकडलं.

‘बॉलिवूड लाइफ’नं दिलेल्या एका वृत्तानुसार अल्लू अर्जुननं वाहतुकीचे नियम मोडले. ज्यामुळे त्याला दंडही भरावा लागला आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनच्या लग्झरी कार लँड रेंज रोवरचं चालान कापून त्याच्याकडून ७०० रुपयांचा दंड देखील वसूल केला. मिळालेल्या माहितीनुसार काळ्या रंगाच्या काचा असलेल्या कारमधील अल्लू अर्जुनला पोलीसांनी हैदराबादच्या बीजी सेंटरजवळ थांबवलं. कारण भारतात अशा प्रकारच्या काचा वापरण्यावर बंदी आहे. मात्र असं असतानाही भारतात अनेक सेलिब्रेटी अशाप्रकारच्या कारचा वापर करतात. पण पोलीस देखील त्यांचं काम चोख पार पाडताना दिसत आहेत.

आणखी वाचा- लग्नानंतर वर्षभरातच शाहिदपासून वेगळं होण्याच्या विचारात होती पत्नी मीरा, एका गैरसमजामुळे…

दरम्यान याआधी तेलुगू दिग्दर्शक Trivikram Srinivas, कल्याण राम, जूनियर एनटीआर आणि Manchu Mano यांनाही अशाप्रकारे कारला काळ्या रंगाच्या काचा वापरल्यानं हैदराबाद ट्राफिक पोलीसांनी रस्त्यात थांबवून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

Story img Loader