सध्या सगळीकडेच दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला आहे. हिंदीमध्ये डब करण्यात आलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांनी तर बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. कोट्यावधी रुपयांची कमाई करत सगळ्याच चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या बऱ्याच काळापासून हिंदीमध्ये डब करण्यात आलेले दाक्षिणात्य चित्रपट हिंदी वाहिन्यांवर दाखविले जातात. या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच ‘आरआरआर’, ‘केजीएफ’, ‘पुष्पा’ सारख्या चित्रपटांना लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट तर प्रचंड गाजला. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. यासाठी अल्लू घेत असलेलं मानधन याची जोरदार चर्चा होत आहे.
मानधनाच्या बाबतीत अल्लूने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग २०२३मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचं बजेट २०० कोटी रुपये इतकं होतं. तर दुसऱ्या भागाचं बजेट हे ४०० कोटी रुपये इतपत असणार असल्याचं बोललं जातंय. या महागड्या चित्रपटासाठी अर्जून जवळपास १०० कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा – बहुप्रतिक्षित ‘आश्रम’ वेबसीरिजचा तिसरा भाग लवकरच येणार, बॉबी देओलने शेअर केला व्हिडीओ
अल्लू अर्जुन जर एका चित्रपटासाठी एवढं मानधन घेणार हे ऐकूनच अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. इतकंच नव्हे तर जगभरातील महागड्या अभिनेत्यांमध्ये मानधनाच्या बाबतीत अल्लू अर्जुनचाही समावेश होईल. खरं तर ‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग त्याच्या पहिल्या भागापेक्षा अधिक चांगला असणार असल्याचं बोललं जात आहे.
आणखी वाचा – “…तर चित्रपट किती कोटी कमावतो याला अधिक महत्त्व” प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान
चित्रपटाचा सेट असो किंवा त्यासाठी करण्यात येणारा खर्च सारं काही अधिक उत्तम असणार आहे. म्हणूनच या चित्रपटाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. ‘पुष्पा’ चित्रपटामधील अर्जूनची स्टाईल, त्याचं चालणं, डायलॉग, गाणी सगळंच हिट ठरलं. हा चित्रपट सुपरहिट ठरण्यामागे अभिनेत्री रश्मिका मंदानाचा देखील खारीचा वाटा आहे. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.