अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट यावर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. आता मात्र अल्लू अर्जुनने आणखी एक नवं सरप्राइज चाहत्यांना दिलं आहे. त्याने नुकतंच ‘पुष्पा ३’ ला मंजुरी दिल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. आता या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या तिसऱ्या भागातील काही सीन्सचे चित्रीकरण झाले असून हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सुपरहिट फ्रँचायझी ‘पुष्पा 3’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. ‘तेलुगु ३६०’ मधील वृत्तानुसार, दिग्दर्शक सुकुमार यांनी अलीकडेच ‘पुष्पा ३’ चे काही सीन्स शूट केले आहेत आणि उर्वरित चित्रपट नंतर पूर्ण करण्याची त्यांची योजना आहे. याबरोबरच हा तिसरा भाग २०२५ च्या उन्हाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा त्यांचा विचार असला तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

आणखी वाचा : इमरान हाश्मीच्या ‘आशिक बनाया आपने’चा सीक्वल येणार प्रेक्षकांच्या भेटीला; पण ‘हा’ ट्विस्ट ठाऊक आहे का?

‘सीयासत.कॉम’च्या रिपोर्टनुसार खुद्द अल्लू अर्जुनेच या तिसऱ्या भागाबद्दल भाष्य करत या गोष्टीची पुष्टी केली आहे. अल्लू अर्जुनच्या म्हणण्यानुसार “प्रेक्षक नक्कीच याच्या तिसऱ्या भागाची अपेक्षा ठेवू शकतात, आम्हाला हा चित्रपट एका फ्रँचायझी सीरिजप्रमाणेच पुढे न्यायचा आहे अन् आमच्याकडे काही रंजक कथादेखील आहेत.” यामुळे आता ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच याच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

‘पुष्पा: द राइज’ २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. सुकुमारने याच्या दिग्दर्शनासोबतच याची कथाही लिहिली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय समंथा रुथ प्रभूचे ‘ऊ अंतवा’ हे गाणेही प्रचंड लोकप्रिय झाले. ‘पुष्पा २’ वर काम सध्या सुरू आहे. अल्लू अर्जुनच्या तब्येतीच्या कुरूबुरीमुळे नोव्हेंबर २०२३ मध्ये काही आठवडे चित्रीकरण थांबवण्यात आले होते, परंतु नंतर ते पुन्हा सुरळीत पार पडले. येत्या १५ ऑगस्टला ‘पुष्पा २’ लोकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा बॉलिवूड विरुद्ध टॉलीवूड हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun confirms that they are working on pushpa 3 avn