Allu Arjun upcoming movie: ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटामुळे अभिनेता अल्लू अर्जुनला खूप लोकप्रियता मिळाली. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना अल्लू अर्जुन स्टाइलचे वेड लागले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडत नवा इतिहास रचला. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहाद फासिल असे कलाकार होते. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाच्या पुढच्या भागाची म्हणजेच ‘पुष्पा द रुल’ची वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये अल्लू अर्जुन व्यग्र आहे. येत्या काही महिन्यामध्ये ‘पुष्पा २’ व्यतिरिक्त त्याचे इतर चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजचे मालक भूषण कुमार करणार आहेत. चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी अल्लू अर्जुन, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा, भूषण कुमार आणि त्यांच्या सहकार्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या भेटीदरम्यानचे फोटो टी सीरिजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा – Oscar 2023 मध्ये खास भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण; अभिनेत्रीच्या पोस्टवर पती रणवीरच्या कमेंटने वेधलं लक्ष

या आगामी चित्रपटाचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. लवकरच चित्रपटाचे नाव जाहीर केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा चित्रपट पुष्पा प्रमाणे पॅन इंडिया असू शकतो. भूषण कुमार यांनी याआधीही बऱ्याचशा पॅन इंडिया चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे रणबीर कपूरसह ‘अ‍ॅनिमल’ (Animal) या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये व्यग्र आहेत.

Story img Loader