ज्येष्ठ चित्रपट निर्माते, आणि ‘पुष्पा 2’ स्टार अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी नुकतीच सिकंदराबाद येथील KIMS कडल्स हॉस्पिटलला भेट दिली. इथे त्यांनी ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची भेट घेतली. नऊ वर्षांच्या श्रीतेजवर दोन आठवड्यापासून या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्लू अरविंद यांनी या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेतली. जखमी श्रीतेजची आई रेवती (वय ३९ वर्षे) हिचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तेलंगणा हायकोर्टाने जामीन मंजूर केला. यानंतर आता अल्लू अरविंद यांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून श्रीतेजच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्याच्या उपचारासाठी मदत केली. गीता आर्ट्स आणि पुष्पा 2 च्या पीआरओने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, अल्लू अरविंद डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर श्रीतेजच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना दिसत आहेत.

हेही वाचा – कैदी क्रमांक ७६९७, रात्रभर फरशीवर झोपला अन्…; अल्लू अर्जुनने तुरुंगात ‘अशी’ घालवली रात्र

तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, ते म्हणाले, “मी नुकतेच आईसीयूमध्ये असलेल्या श्री तेजची भेट घेतली. मागील १० दिवसांपासून तो बरा होत आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे. पण तो बरा व्हायला आणखी वेळ लागू शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.”

अल्लू अरविंद यांचे कुटुंब श्रीतेजच्या उपचारासाठी मदत करणार आहे. “आम्ही त्याला मदत करण्यास तयार आहोत. सरकारही त्याला शक्य ती मदत करणार आहे”, असं ते म्हणाले.

अल्लू अर्जुन मुलाच्या भेटीसाठी का आला नाही?

अल्लू अर्जुनने रुग्णालयात येऊन जखमी मुलाची भेट न घेतल्याबद्दल टीका होत आहे. यासंदर्भात अल्लू अरविंद यांनी प्रतिक्रिया दिली व मुलाची बाजू घेतली. प्रीमियरच्या दिवशी जे घडलं तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने अल्लू अर्जुनला तिथे न येण्यास सांगितलं होतं, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – नेटफ्लिक्सवर या आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या सिनेमांची यादी; १० पैकी ७ भारतीय चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

“लोक, नातेवाईक आणि चाहते विचारत आहेत की अल्लू अर्जुन हॉस्पिटलला का येत नाही. याचं कारण म्हणजे अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयात येणार होता, पण रुग्णालय व्यवस्थापनाने प्रीमियरला जे झालं तरी परिस्थिती उद्भवू नये म्हणून त्याला न येण्याचा सल्ला दिला,” असं अल्लू अरविंद म्हणाले. तसेच राज्य सरकारची परवानगी घेतल्यानंतरच मुलाच्या भेटीसाठी रुग्णालयात आल्याचं त्यांनी सांगितलं.