Allu Arjun gets emotional : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट पुढील काही तासांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाने प्रदर्शनाआधी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनच्या कामात फार व्यस्त आहे. अशात सोशल मीडियावर सुकुमारचा रडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्रमोशनच्या कार्यक्रमात सुकुमार अल्लू अर्जुनचे कैतुक करतात. कौतुकात ते अल्लू अर्जुनसाठी असे शब्द वापरतात की, संपूर्ण कार्यक्रमात अल्लू अर्जुन भावूक होतो, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमातसुद्धा भावूक वातावरण तयार होतं. अशात सुकुमार अल्लू अर्जुनला असं काय म्हणाले की, त्याच्या डोळ्यांत थेट अश्रू दाटले याची माहिती जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : बहिणीने एक्स बॉयफ्रेंडला मैत्रिणीसह जिवंत जाळल्याच्या आरोपानंतर नर्गिस फाखरीची पहिली पोस्ट; म्हणाली, “आम्ही तुमच्यासाठी…”
सुकुमार म्हणाले, “अल्लू अर्जुनबरोबर सिनेविश्वातील माझा प्रवास ‘आर्या’पासून सुरू झाला. मी गेल्या काही वर्षांत त्याला फार जास्त मेहनत घेताना आणि पुढे जाताना पाहिलं आहे. मी त्याचा संघर्ष फार जवळून पाहिला आहे. आज ‘पुष्पा’ जे काही आहे, त्याचं कारण माझं अल्लू अर्जुनवर असलेलं प्रेम आहे. तो छोट्या-छोट्या गोष्टींच्या मागे लागतो आणि त्या सोडवतो. अल्लू अर्जन माझ्यासाठी एक ऊर्जा आहे आणि हा चित्रपट मी त्याच्यासाठीच बनवला आहे”, असं सुकुमार म्हणाले.
इतकंच नाही तर पुढे त्यांनी पुष्पाच्या कामाची सुरुवात करण्याआधीची आठवण सांगितली आहे. त्यांनी म्हटलं की, सुरुवातीला माझ्याकडे या चित्रपटाची कथा नव्हती. माझ्या डोक्यात फक्त काही निवडक सीन होते. मात्र, माझ्याकडे कथा नसली तरी त्यावेळी अल्लू अर्जुनचा विश्वास, त्याची ताकद, संवाद फेकण्याची शैली या सर्व गोष्टी होत्या.”
"మా ఇద్దరి బొండింగ్ అనేది 'Exchange Of Energy'. డార్లింగ్ ఈ సినీమా నీ కోసం తియ్యడం తప్ప ఇంకేం లేదు!" #Sukumar about #AlluArjun pic.twitter.com/fblLkPNZdH
— Rajesh Manne (@rajeshmanne1) December 2, 2024
हेही वाचा : नारकर जोडप्याच्या लग्नाला २९ वर्षे पूर्ण! ‘असा’ साजरा केला वाढदिवस, दोघांच्या रोमँटिक व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
u
“चित्रपटसृष्टी माझं जग आहे आणि हे जग मोठं करण्यासाठी कोणी आपल्या संपूर्ण आयुष्यातील वेळ घालवत असेल तर ही फार मोठी गोष्ट आहे”, असं सुकुमार म्हणाले. त्याच्या याच विधानाने अल्लू अर्जुनच्या डोळ्यात अश्रू तरळले. कार्यक्रमात अल्लू अर्जुन हसत हसत डोळे पुसताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.