Allu Arjun हैदराबाद या ठिकाणी पुष्पा २ या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरला अल्लू अर्जुन उपस्थित राहिला. ज्यानंतर एकच गर्दी आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. अल्लू अर्जुनमुळेच या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होतो आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीही काही आरोप केले आहेत. अल्लू अर्जुनला अटक झाली आणि जामीन मिळाला. दरम्यान अल्लू अर्जुनने जी पत्रकार परिषद घेतली त्यात तो भावूक झाल्याचं आणि हमसून रडल्याचं पाहण्यास मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकी घटना काय? ओवैसींचा आरोप काय?

अल्लू आर्जुनच्या चित्रपटाच्या प्रिमियर शोवेळी झालेली चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यूचा मुद्दा तेलंगणाच्या विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अल्लू अर्जुनवर त्याचे नाव न घेता गंभीर स्वरुपाचे आरोप केले. चेंगराचेंगरीत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे अल्लू अर्जुनला सांगण्यात आले होते. त्यानंतरही तो चित्रपट पाहात बसला. तसेच आता चित्रपट चांगलाच हिट होणार, असंही अल्लू अर्जुन म्हणाला असा दावा, अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेत केला. या आरोपांबाबत जेव्हा अल्लू अर्जुनला विचारलं तेव्हा तो भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं.

अल्लू अर्जुनने बोलवली पत्रकार परिषद

ओवैसी यांच्या या दाव्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या हैदराबादमधील जुबली हिल्स येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने रेवंथ रेड्डी तसेच अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेली घटना हा दुर्दैवी अपघात होता. यात माझा काहीही दोष नाही. चित्रपटगृहाला मी मंदीर समजतो. चित्रपटगृहाच्या परिसरात अशी घटना झाल्यामुळे मला दु:ख झालेले आहे, असे अल्लू अर्जुन म्हणाला.

पुष्पा २ हा सिनेमा हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहचला आहे. (फोटो-अल्लू अर्जून इन्स्टाग्राम)

…आणि अल्लू अर्जुनला अश्रू अनावर

अल्लू अर्जुन म्हणाला, माझ्यावर अपमानजनक आरोप करण्यात आले आहेत. सोबतच असे आरोप करून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. लोक मला गेल्या २० वर्षांपासून ओळखतात. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर चित्रपट हिट होईल, असे मी कसे म्हणू शकतो. मी सध्या माझं कामही करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे असं अल्लू अर्जुनने यावेळी सांगितलं. हे सर्वकाही कथन करत असताना अल्लू अर्जुनला भावना अनावर झाल्या. त्याचा कंठ दाटला होता. त्यानंतर तो हमसून रडू लागला. जे क्षण कॅमेरात कैद झाले.

हे पण वाचा- ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर Pushpa 2 होणार प्रदर्शित, तब्बल ‘इतक्या’ कोटींमध्ये झाला करार

‘पुष्पा द रुल’ हा सिनेमा पुष्पा सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमा पहिल्या आठवड्यातच १ हजार कोटी क्लबमध्ये पोहचला. आता प्रेक्षकांना पुष्पा ३ म्हणजेच पुष्पा द रॅम्पेजची प्रतीक्षा आहे.