साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटाने प्रसिद्धीच्या एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चित्रपटातील त्यांचा दमदार अंदाज आणि नेहमीपेक्षा वेगळी स्टाइल या सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याची डान्स स्टाइल देखील खूप हिट झाली होती. त्यामुळे फारच कमी लोक असतील जे अल्लू अर्जुनबद्दल काही नकारात्मक बोलत असतील. पण अल्लू अर्जुनचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावरून त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

अल्लू अर्जुनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत. या फोटोंमध्ये अल्लू अर्जुनचं वजन आधीपेक्षा थोडं वाढलेलं दिसत आहे. सध्या अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’चं शूटिंग करत असल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि ट्राऊझरमध्ये दिसत आहे. एककीडे अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पाहून खुश झाले आहेत तर काही युजर्सनी मात्र त्याला वाढलेल्या वजनामुळे टर्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

आणखी वाचा- ‘केके’च्या मुलीचं चाहत्यांना भावनिक आवाहन, म्हणाली “माझ्या बाबांच्या टीमविरोधात…”

अल्लू अर्जुनच्या या फोटोंवर कमेंट करताना काही युजर्सनी त्याला ‘म्हतारा’ म्हटलंय, काहींनी ‘मोटा भाई’ तर काहींनी चक्क त्याला ‘वडापाव’ देखील म्हटलं आहे. तर एका युजरनं या फोटोवर , ‘हा तर रस्त्यावरचा चोर दिसत आहे आणि दाक्षिणात्य लोक याचे चाहते आहेत’ अशी कमेंट केली आहे. अल्लू अर्जुनचं असं वाढलेलं वजन पाहून प्रत्येकजण हैराण आहे. आता त्याने चित्रपटासाठी वजन वाढवलंय की आणखी काही वेगळं कारण आहे हे तर आगामी काळातच समजणार आहे.

आणखी वाचा- आलियाशी लग्न करण्याआधीच विवाहित आहे रणबीर? पहिल्या पत्नीबाबत केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘पुष्पा: द राइज’मध्ये दिसला होता. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट मल्याळम, हिंदी, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. लवकरच अल्लू अर्जुन ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader