दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘पुष्पा’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. केवळ दाक्षिणात्यच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अल्लू अर्जुनवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अल्लू अर्जुनचा अभिनय प्रेक्षकांना विशेष आवडला असल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमध्ये दिसून येतं. अशात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक सुकुमार यांनी चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनबाबत मोठा खुलासा केला आहे.


दिग्दर्शक सुकुमार यांनी सांगितलं की चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये त्यांना अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांना एकत्र दाखवायचं होतं. ते म्हणाले, ‘क्लायमॅक्ससाठी मी सुरुवातीला अल्लू अर्जुन आणि फहादला एकत्र दाखवण्याचा विचार केला होता. पण नंतर प्रेक्षकांचा विचार करून वेगळा ट्वीस्ट आणला. याचा ओरिजिनल शॉट वेगळाच होता. अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल हे या सीनमध्ये न्यूड दाखवण्यात येणार होते. पण हे सर्व तेलुगू प्रेक्षकांना आवडलं नसतं. त्यामुळे आम्ही हा सीन बदलला. पण या व्यतिरिक्त असे अनेक सीन आहेत ज्यामुळे हा चित्रपट खराखुरा वाटतो.’

Appi Aamchi Collector
Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Bollywood Actress Marathi Film Debut
सलमान खानच्या शोमुळे लोकप्रिय झाली; ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री आता मराठीत पदार्पण करणार! पहिली झलक आली समोर
Allu Aravind visits Pushpa 2 premiere stampede victim in hospital
Video: अल्लू अर्जुनच्या वडिलांनी ‘पुष्पा 2’ च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची रुग्णालयात घेतली भेट
ravi kishan on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…”
Pushpa 2 Box Office Collection Day 9
अल्लू अर्जुनच्या अटकेच्या दिवशी Pushpa 2च्या कमाईत घट, कमावले ‘इतके’ कोटी
Telangana CM Revanth Reddy on Allu Arjun arrest
Revanth Reddy on Allu Arjun arrest: “अल्लू अर्जुन सीमेवर युद्ध लढत नाहीये, पैसे कमवतोय”, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फायर मोडमध्ये; अटकेचं केलं समर्थन
Allu Arjun released after spending night in jail
अल्लू अर्जुनला तुरुंगात घालवावी लागली रात्र, सुटकेनंतरचा पहिला व्हिडीओ आला समोर

दरम्यान या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांचा एक इंटीमेट सीन शूट केला होता. पण चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यावर बरीच टीका झाली. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातून हा सीन काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर सीन हटवण्यात आला. हा सीन वगळता चित्रपटातील अॅक्शन, स्टंट आणि अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा अभिनय या सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.


‘पुष्पा: द राइज’ हा या चित्रपटाचा पहिला भाग आहे. त्यानंतर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा: द रुल’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी घोषणा दिग्दर्शक सुकुमार यांनी केली आहे. यामध्ये अनेक रॉ सीन असणार आहेत असंही त्यांनी सांगितलं. या चित्रपटाची कथा चंदन तस्करांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांना पकडण्यासाठी पोलिस शक्य ते सर्व प्रयत्न करत असतात.

Story img Loader