दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने, त्याच्या डायलॉग्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. दोन दिवसांपूर्वी पुष्पाची एक झलक दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला होता.

हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा एक जबरदस्त रौद्र रूप समोर आलं आहे. नुकतंच अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘पुष्पा २’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

आणखी वाचा : नंबी नारायणन यांच्यानंतर ‘या’ महान शास्त्रज्ञाच्या बायोपिकमध्ये झळकणार आर माधवन; पोस्टर प्रदर्शित

या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन म्हणजेच पुष्पा हा अत्यंत रौद्र अवतारात आपल्या बघायला मिळत आहे. त्याच्या गळ्यात वेगवेगळे दागिने, हारतुरे तसेच लिंबाची माळ बघायला मिळत आहे. चेहेऱ्यावर दैव नर्तक ज्या पद्धतीने रंगरंगोटी करतात त्याप्रमाणे पुष्पाच्या चेहेऱ्यावरही मेकअप केला गेला आहे. हातात अंगठ्या, दागिने आणि एका हातात बंदुक पकडलेल्या पुष्पाचा लूक पाहून चाहत्यांना वेड लागायचंच बाकी आहे.

अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून लोकांनी यावर भरभरून कॉमेंट केल्या आहेत. अल्लू अर्जुनला शुभेच्छा देत त्याच्या या लूकची काही लोकांनी प्रशंसा केली आहे तर काहींनी याची तुलना ‘कांतारा’शी केली आहे. “हा सगळा कांताराचा परिणाम आहे”असं एका युझरने कॉमेंट करत लिहिलं आहे. एकंदरच पुष्पाचा हा लूक पाहून प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढली आहे. उद्या अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे, त्यामुळे उद्यादेखील या चित्रपटाबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader