सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने जगभरात किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा : तू जे करत आहेस हे बरोबर आहे की चुकीचे…; अल्लू अर्जुनने समांथासाठी केलेले वक्तव्य चर्चेत

‘२०२१मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. या चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२२मध्ये देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने जवळपास २३.२३ कोटी रुपये कमावले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun pushpa created a new record at the box office the film worldwide avb