‘गणेशोत्सव’ हा सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो. बुधवारी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाचे आगमन होत आहे. बॉलिवूडमधील कलाकार देखील आपापल्या घरी हा सण उत्साहाने साजरा करतात. बॉलिवूडचे काही चित्रपट मात्र सध्या बॉयकॉट करत आहेत. मात्र दाक्षिणात्य चित्रपटांना लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा पूर्ण देशभरात होताना दिसून येत आहे. नुकताच येऊन गेलेला दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा, अल्लू अर्जुनने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली, या चित्रपटाची हवा आजही आहे. यंदाच्या गणेशोत्सवात चक्क ‘पुष्पा’ स्टाइल बाप्पाची मुर्ती बनवण्यात आली आहे.
‘पुष्पा’ स्टाइल बाप्पाच्या मुर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे यंदा काही ठिकाणी पुष्पा स्टाइलमध्ये बाप्पाचं आगमन होणार आहे. अल्लू अर्जुनचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्याच्या स्टाइलमध्ये बाप्पाचं आगमन करत आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळत आहे.
Photos : शिल्पाच्या घरी यंदाही बाप्पा आला, पती राज कुंद्राने केले आगमन
यंदाचा गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर साजरा करताना दिसत आहेत. गेली दोन वर्ष निर्बंध असल्याने यंदाच्या वर्षी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात ढोल पथक वादक पुन्हा एकदा जोशात वाजवत आहेत. पुष्पा प्रमाणे आणखीन एका दाक्षिणात्य चित्रपटातील व्यक्तिरेखिची गणेशमूर्ती पहायला मिळत आहे. ती म्हणजे नुकताच येऊन गेलेला आर आर आर चित्रपटातील राम चरणने जी भूमिका साकारली आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेली गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे.
पुष्पा या चित्रपटाच्या पहिल्या भागाने सर्वांनाच वेड लागले, आता चाहते पुढच्या भागाची वाट पाहत आहेत. पुष्पाच्या निर्मात्यांनी नुकतीच पुष्पा भाग २ च्या चित्रीकरणाला सुरवात केली आहे. या भागात अल्लू अर्जुनचे दोन लूक बघायला मिळणार आहेत.