दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या स्टाइलची बरीच चर्चा रंगली होती. त्याच्या पुष्पा स्टाइलने सगळ्यांनाच वेडं करून सोडलं होतं. त्याच्या चित्रपटातील “झुकेगा नही साला” हा डायलॉगही प्रचंड व्हायरल झाला होता.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ स्टाइलची भूरळ न्यूयॉर्कच्या महापौरांनादेखील पडली आहे. एका फॅन पेजवरून न्यूयॉर्कच्या महापौरांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कचे महापौर इरिक आणखी दोघांसह अल्लू अर्जुनप्रमाणे “झुकेगा नही साला” ही पुष्पाची हुक स्टेप करताना दिसत आहेत. “’पुष्पा’ या भारतीय चित्रपटावर प्रेम दाखवल्याबद्दल न्यूयॉर्कच्या महापौरांचे मनापासून धन्यवाद”, असं शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> कुंकू, मंगळसूत्र घातलेला फोटो पोस्ट करत उर्वशी रौतेलाने पुन्हा वेधलं लक्ष, चाहते म्हणाले “वर्ल्ड कप झाल्यानंतर…”

हेही वाचा >> साजिद खानवर शर्लिन चोप्राने पुन्हा केले गंभीर आरोप, गुप्तांगाचा उल्लेख करत म्हणाली “त्याने मला…”

अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्याच्या नायिकेची भूमिका साकारलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही प्रसिद्धीझोतात आली. आता ‘पुष्पा’ या चित्रपटाचा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करण्यात आली आहे.

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

‘पुष्पा २’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह इतरही कलाकरांची वर्णी लागल्याचं बोलण्यात येत होतं. परंतु, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही चुकीची माहिती असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. आता चाहत्यांना ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

Story img Loader