दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा धमाकेदार अॅक्शन चित्रपट ‘पुष्पा’ प्रदर्शनानंतर बराच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला. त्यानंतर ७ जानेवरीला प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र हिंदी भाषेत हा चित्रपट अद्याप ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलेला नाही. त्यामुळे हिंदी भाषेत हा चित्रपट कधी रिलीज होणार यांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण आता लवकरच हा चित्रपट हिंदी भाषेतही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

हिंदी भाषेतील ‘पुष्पा’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे जेव्हा ७ जानेवारीला हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये ओटीटीवर प्रदर्शित झाला तेव्हापासून प्रेक्षक याच्या हिंदी व्हर्जनची आतुरतेनं वाट पाहताना दिसत होते. पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. येत्या १४ जानेवरीला प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

देशात करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रेक्षक आता काही राज्यांमध्ये चित्रपटगृह बंद करण्यात आली आहे. तसेच अनेक प्रेक्षकही सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटगृहांमध्ये जाणं टाळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ‘पुष्पा’ ओटीटीवर प्रदर्शित होणं ही प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. चित्रपटाच्या कमाईचा चढता आलेख पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची किती लोकप्रियता आहे हे लक्षात येतं.

‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन सोबतच अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. याशिवाय या चित्रपटात फहद फासिल, अनसूया भारद्वाज आणि अजय घोष यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हिचं आयटम नंबरही आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.