Pushpa 2 Release Date: ‘पुष्पा : द राइज’ चित्रपटानंतर गेल्या तीन वर्षांपासून ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच पुन्हा एकदा निर्मात्यांनी ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. यासंदर्भात अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करून नवीन तारीख जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लू अर्जुनचे २४ ऑक्टोबरला ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाचा नवा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये पुष्पाराजने एका हातात पडकलेला बंदूकीकडे बघत दुसरीकडे तोंडात चिल्लम पकडली आहे. नोटांच्या गड्डीत पुष्पाराज उभा राहिलेला दिसत आहे. त्यामुळे यावेळेला पुष्पाराज ‘पुष्पा : द राइज’पेक्षा अधिक श्रीमंत होणार असल्याच पाहायला मिळत आहे. आता लाल चंदनची तस्करी करून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी पुष्पाराज सज्ज झाला आहे. याच पोस्टरमध्ये ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख लिहिण्यात आली आहे.

हेही वाचा – किशोरी शहाणे, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची ग्रेट भेट; अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाल्या, “मी स्वतःला…”

सुरुवातीला ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. कारण तेव्हाच ‘स्त्री २’ आणि इतर चित्रपट प्रदर्शित होतं होते. ६ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. पण, याच दिवशी विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आता पुष्पाराज ६ डिसेंबरला नाही तर ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : हेमा शर्मानंतर रातोरात ‘या’ सदस्याला सलमान खानच्या शोमधून दाखवला बाहेरचा रस्ता, नेटकरी म्हणाले, “योग्य निर्णय”

हेही वाचा – Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा जाण्यासाठी जगभरातून चाहत्याचे येतायत फोन, पत्नी अनुभव सांगत म्हणाल्या, “काहीजण रडतात अन्…”

दरम्यान, आतापर्यंत ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत. ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘सुसेकी’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहेत. तसंच ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटातील आयटम साँग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आयटम साँगमध्ये समांथा प्रभू नव्हे तर बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार असल्याचं काही दिवसांपूर्वी वृत्त आलं होतं. त्यामुळे आता आयटम साँगमध्ये अल्लू अर्जुनबरोबर श्रद्धा कपूर थिरकताना दिसणार की दुसरी अभिनेत्री? हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun rashmika mandanna starr pushpa 2 the rule new release date annouced pps