Allu Arjun Video: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४ रोजी) अटक करण्यात आली होती. ‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेत्याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. शुक्रवारी दिवसभर घडलेल्या बऱ्याच घडामोडीनंतर त्याला तेलंगणा हायकोर्टाने जामीन मंजूर केला. मात्र अभिनेत्याला आज सोडण्यात आलं.

एएनआयने आज (शनिवारी, १४ डिसेंबरला) अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो कारमध्ये घरी जाताना दिसत आहे. अभिनेत्याला चेंगराचेंगरी प्रकरणात अटक झाल्यानंतर एक रात्र तुरुंगात घालवावी लागली आहे. तो अटक झाली तेव्हाची ‘फ्लॉवर नहीं, फायर है मैं’ असं लिहिलेली हुडी घालून व्हिडीओत दिसतोय.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”

अल्लू अर्जुनचा व्हिडीओ –

अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आलं. याचदरम्यान, अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाल्यानंतर त्याला कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टाने त्याला जामीन दिला होता. त्यानंतर तो आज घरी जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानुसार, त्याला एक रात्र तुरुंगात घालवावी लागली आहे.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”

नेमके प्रकरण काय?

‘पुष्पा २’ चित्रपटाचा प्रिमियर इव्हेंट ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्याला शुक्रवारी अटक झाली. अखेर संध्याकाळी सुनावणीनंतर तेलंगणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आणि आज त्याची सुटका झाली.

Story img Loader