Allu Arjun National Award : टॉलीवूडचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रचंड गाजला. अल्लू अर्जुनने यामध्ये महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले. इतकेच नाही तर त्याने थेट राष्ट्रीय पुरस्कारालादेखील गवसणी घातली. पुरस्कार मिळाल्यानंतर जवळपास एक वर्षाने अल्लू अर्जुनने सांगितले की, जेव्हा त्याला हा पुरस्कार मिळाला तेव्हा तो दु:खी होता.

अल्लू अर्जुनला साल २०२३ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरणारा अल्लू अर्जुन पहिलाच तेलुगू अभिनेता आहे. अल्लू अर्जुन नुकताच NBK च्या अनस्टॉपेबल शोमध्ये आला होता. त्यावेळी मुलाखतीत त्याने राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. त्याने सांगितले, ” मी सुकुमारला फक्त एकच गोष्ट सांगितली होती; हा चित्रपट हिट झाला नाही तरी मला त्याची पर्वा नाही. मात्र, या चित्रपटामुळे आपल्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळावा अशी माझी इच्छा आहे.”

Allu Arjun Emotional
Allu Arjun : “फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो, ‘त्या’ घटनेचा उल्लेख करताच अल्लू अर्जुनचा कंठ दाटला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Priyanka Gandhi Vadra Parliament speech
Priyanka Gandhi Speech: प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपाला आणीबाणीपासून शिकण्याचा सल्ला का दिला?
ravi kishan on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…”
Telangana CM Revanth Reddy on Allu Arjun arrest
Revanth Reddy on Allu Arjun arrest: “अल्लू अर्जुन सीमेवर युद्ध लढत नाहीये, पैसे कमवतोय”, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फायर मोडमध्ये; अटकेचं केलं समर्थन
allu arjun arrest bollywood actor vivek oberoi shares post
“हा अपघात राजकीय प्रचारसभेत झाला असता…”, अल्लू अर्जुनच्या अटकेवर विवेक ओबेरॉयचं स्पष्ट मत; उपस्थित केले ‘हे’ प्रश्न
allu arjun arrested cm revanth reddy reaction
अल्लू अर्जुनच्या अटकेवर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हस्तक्षेप करणार नाही…”
varun dhawan reaction on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटकेबद्दल बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया, अभिनेता म्हणाला, “घडलेली घटना दुर्दैवी, पण त्याचा दोष…”

हेही वाचा : ऐश्वर्या रायच्या लग्नानंतर सलमान खान म्हणालेला, “अभिषेक खूप…”

मुलाखतीमध्ये NBK ने अल्लू अर्जुनला म्हटले, “तेलुगू सिनेविश्वात पहिल्यांदाच एका अभिनेत्याला सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तू म्हटला होतास की, आम्ही व्यावसायिक चित्रपटासाठी राष्ट्रीय स्थरावरील मान मिळवू आणि तू हे करूनही दाखवले, तर आता तुला यावर काय वाटते?” या प्रश्नाचे उत्तर देताना अल्लू अर्जुन म्हणाला की, एकदा मी राष्ट्रीय पुरस्कारांची यादी पाहत होतो, तेव्हा मला त्यात एकही तेलुगू नाव दिसले नाही. यात फक्त नागार्जुन सरांचे नाव होते. मात्र तेदेखील एका विशेष भूमिकेसाठी होते. सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारे कोणीही नव्हते. ही गोष्ट माझ्या मनात राहिली.”

” मी यावर विचार करत होतो. तेलुगूमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. मात्र अद्याप हा पुरस्कार का मिळाला नाही? त्यांची पिढी यात मागे कशी राहिली? या प्रश्नांनी माझ्या मनात घर केले होते”, असे अल्लू अर्जुनने आपल्या मुलाखतीत सांगितले.

पुरस्कार मिळाला तेव्हा मी दु:खी होतो

अल्लू अर्जुनने पुढे सांगितले की, ” जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मी आनंदी होण्याऐवजी दु:खी होतो. माझ्या मनात सतत एक गोष्ट फिरत होती ती म्हणजे, हा पुरस्कार जिंकण्यासाठी तेलुगू कलाकारांना इतका उशिर का झाला.”

अल्लू अर्जुन पुढे म्हणाला, “सुकुमार आणि मी जेव्हा पुष्पासाठी नियोजन सुरू केले तेव्हाच मी मनात ठरवले की, मला राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालायची आहे. मी याआधी याबद्दल कुणालाही काही सांगितले नाही. मी पहिल्यांदाच हे सांगत आहे; सुकुमारला मी म्हणालो होतो, पुष्पा चित्रपट जास्त चालला नाही तरी चालेल. मात्र यासाठी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार नक्की जिंकायचा आहे. त्यासाठी तू मला मदत कर.”

हेही वाचा : अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले

“त्यानंतर सुकुमार आणि मी शूटिंगच्या वेळी प्रत्येक टेक घेताना यावर बोलायचो. शॉट सुरू असताना सुकुमार मला म्हणायचा डार्लिंग राष्ट्रीय पुरस्कारासाठी असा शॉट पुरेसा नाही. मग मी आणखी छान करण्याचा प्रयत्न करायचो. असे प्रत्येक शॉट घेताना होत होते.” अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’च्या यशानंतर आता ‘पुष्पा २: द रुल’ ची तयारी सुरू आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader