Allu Arjun: तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. ४ डिसेंबरला ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला व तिचा मुलगा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४ रोजी) अटक केली, नंतर त्याला जामीन मिळाला; मात्र त्याला एक रात्र तुरुंगात राहावं लागलं. या संपूर्ण अटक प्रकरणानंतर आता अल्लू अर्जुनने जखमी मुलाबद्दल पोस्ट केली आहे.

अल्लू अर्जुनने जखमी मुलाची भेट का घेतली नाही, त्याबद्दलही पोस्टमध्ये सांगितलं आहे. “दुर्दैवी घटनेत जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असलेल्या श्री तेजबद्दल मला खूप काळजी वाटत आहे. सध्या सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे, मला आता त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना न भेटण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्याबरोबर आहेत. मी त्याचा वैद्यकीय खर्च आणि इतर कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी मी प्रार्थना करतोय. मी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यास उत्सुक आहे,” असं अल्लू अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
Dispute over fathers treatment man kills grandmother in solapur
वडिलांच्या उपचारावरून वाद; नातवाने केला आजीचा खून

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”

हेही वाचा – अल्लू अर्जुनला तुरुंगात देण्यात आले होते ‘हे’ अन्नपदार्थ, पुरवण्यात आल्या होत्या ‘या’ सुविधा; वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती

अल्लू अर्जुनने उचलला मुलाच्या उपचाराचा खर्च

अल्लू अर्जुनच्या टीमने या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. जखमी मुलाच्या उपचाराचा खर्च अभिनेत्याने उचलला आहे. मुलाच्या उपचारासाठी परदेशातून तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आलं आहे. तसेच हा पब्लिसिटी स्टंट नाही, असं त्याच्या टीमने सांगितलं आहे.

हेही वाचा – नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…”

अल्लू अर्जुनला १३ डिसेंबरला अटक झाली आणि १४ डिसेंबरला त्याला चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आलं. तेलंगणा हायकोर्टाने त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर चार आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे. अल्लू अर्जुन घरी परतल्यानंतर चिरंजीवी, राणा दग्गुबाती, नागा चैतन्य, विजय देवरकोंडा, व्यंकटेशसह अनेक तेलुगू कलाकारांनी त्याची भेट घेतली. बॉलीवूडसह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या. चेंगराचेंगरीच्या घटनेसाठी चित्रपटाच्या अभिनेत्याला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं कलाकारांनी म्हटलं होतं.

Story img Loader