दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन हा गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. त्याच्या या लोकप्रियतेच एक कारण म्हणजे त्याचा स्वभाव आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या चित्रपटाच्या कथेच्या निवडीवर वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्लू अर्जुनने नुकतीच अमर उजालाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला त्याच्या चित्रपटाविषयी विचारण्यात आले. त्यावर उत्तर देत अल्लू अर्जुन म्हणाला, “तो जेव्हा पण कमर्शिअल चित्रपट बनवतो, तेव्हा काळजी घेतो की त्या चित्रपटाला पाहताना मुलं आणि थिएरटमध्ये असलेल्या महिला विना संकोच करता पाहू शकतात.”

आणखी वाचा : अमिताभ बच्चन आहेत क्रिप्टो किंग, १.६ कोटी रुपयांची गुंतवणुक करत कमावले ११२ कोटी रुपये

अल्लू अर्जुन पुढे म्हणाला, “जो चित्रपट तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही, तो असा चित्रपट कधीच करणार नाही. याचा अर्थ जो चित्रपट तो त्याच्या कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही, तर अशा चित्रपटांमध्ये तो काम करणार नाही.”

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या सिक्वलच्या तयारीत आहे. त्याला सध्या याच चित्रपटावर लक्ष द्यायचं आहे. लवकरच आपल्याला ‘पुष्पा २’ हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun says wont do movies that he can not watch with daughter and wife dcp