Pushpa 2 Teaser: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या स्टाईलने, त्याच्या डायलॉग्सने सर्वांनाच वेड लावलं होतं. यानंतर आता मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनची पहिली झलक समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुष्पा सुपरहिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. तर ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाची टीम या चित्रपटाबद्दल अपडेट्स देत आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची झलक पाहण्यासाठी सर्वजण खूप आतुर झाले होते. तर आता ही प्रतीक्षा संपली आहे.

आणखी वाचा : शाहरुख आणि सलमानच्या आगामी चित्रपटांना मागे टाकत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ने रचला नवा विक्रम

‘पुष्पा २’ चित्रपटाचा अनाऊन्समेंट टीझर आज प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. या टीझरमध्ये ‘पुष्पा’ तिरुपती तुरुंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सर्वांना एकाच प्रश्न पडला आहे की “पुष्पा कुठे आहे?” तर टीझरमध्ये ‘पुष्पा २’चा संपूर्ण टीझर म्हणजेच ७ एप्रिल रोजी दुपारी रिलीज होईल असा ईशारा दिला आहे.

हेही वाचा : ‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आघाडीचा बॉलिवूड स्टार, दिग्दर्शक करत आहे ‘या’ दोन नावांचा विचार

अल्लू अर्जुनच्या डॅशिंग स्टाईलने ‘पुष्पा’चा शेवट करण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या पूढील भागात पोलिस आणि पुष्पा यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. तर आता सर्वजण ७ एप्रिलची वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allu arjun starrer most waited film pushp 2 teaser got released rnv