‘पुष्पा’ या तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. त्याचे लेखन आणि दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहद फाजीलसह अनेक स्टार्सचा दमदार अभिनय यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला होता आणि आता चाहते त्याच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘पुष्पा – द रुल’ हा दूसरा भाग यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचं स्पष्ट झालं होतं, पण आता समोर आलेल्या बातम्यांमुळे या चित्रपटाच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल, कारण ‘पुष्पा’च्या पुढच्या भागाचं चित्रीकरण पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : राघव चड्ढा यांच्यासह परिणीती चोप्रा लवकरच बांधणार लग्नगाठ; आधी ‘या’ अभिनेत्यांबरोबर जोडलं होतं नाव

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’चं चित्रीकरण अचानक थांबवण्यात आले आहे. याचे कारण खुद्द दिग्दर्शक सुकुमार आहेत असे सांगितले जात आहे. आतापर्यंत जे काही चित्रित झाले आहे त्याचं फायनक आऊटपूट पाहता चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक खूश नसल्याचं स्पष्ट झालं आहे. विझागमध्ये महिन्याभराच्या शेड्यूलनंतर चित्रीकरण थांबवण्यात आले होते, जे अद्याप सुरू झालेले नाही.

आणखी वाचा : वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांनीच लावली ड्रग्सची सवय; ‘आयर्न मॅन’फेम रॉबर्ट डाउनी ज्युनिअरबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

मीडिया रीपोर्टनुसार दिग्दर्शक सुकुमार या चित्रित केलेल्या सीन्सच्या बाबतीत समाधानी नसल्यामुळे ‘पुष्पा २’ चा टीझरही प्रदर्शित होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ८ एप्रिल या दिवशी अल्लू अर्जुनचा वाढदिवस असतो त्यामुळे या दिवशी ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. सुकुमार यांना पुन्हा एकदा सगळे सीन्स पुन्हा चित्रित करायचे असून आत्तापर्यंत जे काही शूट केले आहे ते सुकुमार यांना डिलिट करायचे आहेत.

Story img Loader