सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. आता अल्लू अर्जुनने तिचे आभार मानले आहे.
‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर समांथाने पहिल्यांदाच आयटम साँग केले आहे. या गाण्यात ती एकदम बोल्ड अंदाजात दिसत आहे. चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये अल्लू अर्जुनने समांथाचे आभार मानले आहेत.
Video: सलमान आणि जिनिलियाचा भन्नाट डान्स, पनवेल फार्महाऊसवरचा व्हिडीओ व्हायरल
अल्लू अर्जुनने खरं तर समांथासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘समांथा तू हे गाणे केलेस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तुझा माझ्यावर विश्वास असल्यामुळे तू या गाण्यासाठी तयार झालीस. त्यासाठी तुझे आभार. सेटवर आल्यावर तुला तू जे करत आहेस हे बरोबर आहे की चुकीचे असा प्रश्न पडत होता. पण मी तुला केवळ एक गोष्ट सांगितली होती की माझ्यावर विश्वास ठेव आणि गाण्याच्या चित्रीकरणास सुरुवात कर. त्यानंतर तू मला एकही प्रश्न विचारला नाहीस. मी सांगितल्या प्रमाणे केल्याबद्दल तुझे आभार. तू माझे मन जिंकले आहेस आणि मी तुझा नेहमी आदर करेन’ असे बोलताना दिसत आहे.
पुढे गाण्याच्या यशाबद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला, ‘सध्या हे अतिशय हिट ठरत आहे आणि त्यासाठी तुझे अभिनंदन. यूट्यूबवर हे गाणे एक नंबरवर आहे. हे इतकं सोपं नाही. सर्वांना हे गाणे आवडत आहे.’