दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. या चित्रपटातील गाण्यांपासून डायलॉग हे सर्वच चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाशी संबंधित एक नवीन आणि मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अल्लू अर्जुनचे ‘पुष्पराज’मध्ये ट्रान्सफॉर्मेशन कशाप्रकारे व्हायचे हे पाहायला मिळत आहे. अवघ्या काही क्षणात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन हा आपल्या महागड्या गाडीतून खाली उतरताना दिसत आहे. यात तो काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तो गाडीतून उतरुन थेट त्याच्या व्हॅनिटी व्हॅनकडे जातो. त्याठिकाणी हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप करणारे कलाकार आधीच उपस्थित असल्याचे दिसत आहे.

यात तो एका खुर्चीवर बसून कॉफी पिताना दिसत आहे. तर दुसरीकडे हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप करणारे कलाकार हे अल्लू अर्जुनचा मेकअप करताना दिसत आहेत. यात सुरुवातीला हेअर स्टालिस्ट त्याचे केस पुष्पराजप्रमाणे नीट व्यवस्थित करतात. त्यानंतर त्याला मेकअप केला जातो.

यावेळी त्याच्या कपाळावर जखमेची खूण केली जात असल्याचे दिसत आहे. त्यासोबत त्याच्या हात आणि छातीवरही मेकअप केला जातो. तसेच त्याच्या या चेहऱ्यावर सर्वात शेवटी चामखीळ बनवला जातो. यानंतर तो हुबेहुब ‘पुष्पराज’ प्रमाणे दिसतो. यानंतर अल्लू अर्जुन हा आरशाकडे पाहत पुष्पाप्रमाणे दाढीवरुन हात फिरवतो.

“देवमाणूस नाम सूनके भगवान…”, देवमाणूस मालिकेतील पुष्पा कनेक्शन पाहिलेत का?

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.