दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. ‘पुष्पा’ चित्रपटानंतर अल्लू अर्जुनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. नुकताच अल्लू अर्जुन मुंबईमध्ये दिसला. यावेळी त्याच्यासोबत त्याचे कुटुंबिय देखील होते. यावेळचा अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यातील अल्लू अर्जुनचं वागणं लोकांना आवडलेलं नाही. अल्लू अर्जुनच्या या व्हिडीओवर अनेकांनी राग व्यक्त केला आहे.
अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. यावेळी तो त्याच्या कुटुंबासोबत होता. डोक्यावर गोल टोपी, डोळ्यावर चष्मा यामध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग पाहण्यासारखा होता. मुंबईत स्पॉट झालेल्या अल्लू अर्जुनचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर उत्सुक होते. काही चाहते देखील त्याला भेटण्यासाठी आतुर होते. मात्र अल्लू अर्जुननं त्यांना भेटणं किंवा फोटोसाठी पोझ देणं दूर त्यांच्याकडे पाहिलं देखील नाही.
आणखी वाचा- कोणी म्हटलं ‘मोटा भाई’ तर कुणी ‘वडापाव’, वाढलेल्या वजनामुळे अल्लू अर्जुन ट्रोल
अल्लू अर्जुनचं हेच वागणं सर्वांना खटकलं आहे. एकीकडे दाक्षिणात्य अभिनेते दयाळू आणि विनम्र असल्याचं बोललं जात असतानाच अल्लू अर्जुनचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. अनेकांनी त्याच्या या वागण्यावर राग व्यक्त केला आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, असं तर कोणताही बॉलिवूड कलाकारही वागत नाही. अनेकांनी यावर कमेंट करत अल्लू अर्जुनच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर, ‘तुला एवढा कोणत्या गोष्टीचा गर्व आहे?’ असा प्रश्न विचारला आहे.
आणखी वाचा- ‘पुष्पा २’मध्ये होणार श्रीवल्लीचा मृत्यू? चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य
अल्लू अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो अखेरचा ‘पुष्पा: द राइज’मध्ये दिसला होता. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. तेलुगू व्यतिरिक्त हा चित्रपट मल्याळम, हिंदी, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. लवकरच अल्लू अर्जुन ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटात दिसणार आहे.