Allu Arjun wife Sneha Reddy Video : तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाली आहे. चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात एक रात्र घालवल्यानंतर अल्लू अर्जुन आज घरी पोहोचला. यावेळी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. अभिनेता घरी पोहोचताच त्याची पत्नी स्नेहा रेड्डी तिथे गेली. स्नेहाचा पतीला भेटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये स्नेहा रेड्डी अल्लू अर्जुनला धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते. स्नेहाबरोबर तिची चिमुकली लेकदेखील आहे. अल्लू अर्जुन व स्नेहा रेड्डीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पोलीस अटक करायला आले तेव्हा अल्लू अर्जुन काळजीत असलेल्या पत्नीला हसवण्याचा प्रयत्न करत होता. तो पत्नीला कपाळावर किस करून नंतर पोलिसांबरोबर गेला होता. त्यानंतर आज तो घरी आल्यावर स्नेहा मुलीला घेऊन त्याला भेटायला आली, तेव्हा तिला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा – Video: अल्लू अर्जुनची अटक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया, हात जोडत म्हणाला…

पाहा व्हिडीओ –

४ डिसेंबरला हैदराबादमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रटाचा प्रिमियर इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी अल्लू अर्जुन व चित्रपटाची टीम आली होती. इथे गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात आहे. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मग अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने त्याला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ४ आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर आज (शनिवारी) अल्लू अर्जुनची चंचलगुडा तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि तो आज घरी परतला.

हेही वाचा – अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला तरी जीव गमवावा लागत असेल तर…”

अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया

“प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. काळजी करण्यासारखं काहीही नाही. मी ठीक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. घडलेली घटना खूप दुर्दैवी होती आणि मी पुन्हा एकदा त्याबद्दल शोक व्यक्त करतो. जे घडलं त्याबद्दल आम्हालाही वाईट वाटत आहे,” असं अल्लू अर्जून तुरुंगातून बाहेर आल्यावर म्हणाला.

Story img Loader