गेल्या काही वर्षात अनेक स्टार किड्सनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. आता आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारा अभिनेता अल्लू अर्जुन याची लेकही मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती एका वेगळ्या भूमिकेतून प्रवक्षकांसमोर येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली असून मोठ्या स्टारकास्ट बरोबर ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
आणखी वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’ने रचला नवा विक्रम, ‘या’ गोष्टीत ‘ब्रह्मास्त्र’ला टाकले मागे
या चित्रपटाचे नाव आहे ‘शाकुंतलम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगु सोबतच तो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही येणार आहे. तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘शाकुंतलम’ या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाच वर्षांची मुलगी अल्लू अऱ्हादेखील आहे. अल्लू अऱ्हा या चित्रपटात राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा राजकुमार भरत यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे.
अल्लू अर्जुन प्रमाणेच अल्लू अऱ्हा सोशल मीडियावर अकाउंट आहे. त्यावर वेळोवेळी तिचे फोटो अपडेट होत आतात. या महिन्याच्या ३० तारखेला मणिरत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन’ प्रदर्शित झाल्यानंतर, दिग्दर्शक गुणशेखरचा चित्रपट ‘शाकुंतलम’ यावर्षी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटात आपल्या नृत्याने अनेकांची मने जिंकणाऱ्या शकुंतलाच्या भूमिकेत अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू दिसणार आहेत. ‘शाकांतुलम’ हा चित्रपट संस्कृत कवी कालिदास यांनी याच नावाने लिहिलेल्या एका उत्कृष्ट नाटकावर आधारित आहे. तिच कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
या चित्रपटात मल्याळम अभिनेता देव मोहन पुरू राजा दुष्यंतच्या भूमिकेत आहे. हा त्याचा पहिला तेलगू चित्रपट आहे. तर मोहन बाबू, गौतमी आणि आदिती बालन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. यात अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अऱ्हा दुष्यंत-शकुंतला यांचा मुलगा भरतच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘शाकुंतलम’ हा उत्कृष्ट व्हीएफएक्स असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. दुष्यंत आणि शकुंतलाची ही प्रेमकथा यात दिसली आहे. दिग्दर्शक गुणशेखर यांनी ही प्रेमकहाणी एका भव्य शैलीत दाखवली आहे.