सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. करोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षात बऱ्याचशा सणांवर निर्बंध लादले गेले. हे संकट निघून गेल्यामुळे यंदा सर्वच सण मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवामध्येही खूप धामधूम पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण गणरायाची मनोभावे सेवा करत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दरम्यान ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने पोस्ट केलेला एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी गौरीसह पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. त्यामुळे सगळीकडे विसर्जनाची तयारी सुरू झाली होती. अशाच एका विसर्जन सोहळ्याला सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या परिवारासह उपस्थित होता. तेव्हाचा व्हिडीओ देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विसर्जन मिरवणूक असलेल्या ठिकाणी अल्लू अर्जुन त्याच्या गाडीमधून पोहचताना दिसतोय. त्याच्यासह त्यांची मुलगी आरहा असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.
आणखी वाचा- VIDEO: “ये भारत का तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”; न्यूयॉर्कमध्ये अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं

एका हातात आरहाला उचलत आणि दुसऱ्या हातात तिने बनवलेली बाप्पाची मूर्ती पकडत तो मिरवणूकीकडे वळतो. मग मुर्त्यां घेऊन जाणाऱ्या वाहनासमोर नारळ फोडतो. पुढे अल्लू अर्जुन तेथे जमलेल्या भाविकांसह ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत नाचायला लागतो. तो त्याच्या मुलीकडे पाहत तिलाही नाचायला लावतो. व्हिडीओच्या शेवटी तो आरहाला बाप्पाच्या मोठ्या मूर्तीजवळ पाया पडायला नेतो आणि जाता जाता आपल्या चाहत्यांना हात हलवत निरोपही देतो.

आणखी वाचा- “बॉलिवूडमध्ये सगळेच बायसेक्शुअल…” प्रसिद्ध डिझायनरचा धक्कादायक खुलासा

अल्लू अर्जुनने पोस्ट केलेला हा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या कृतीचे कौतुक केले आहे. यातून अल्लू अर्जुन त्याच्या मुलांना आपला धर्म, आपली संस्कृती शिकवण्यासाठी किती उत्सुक आहे हे दिसून येते असे म्हणत बऱ्याच जणांनी त्याची स्तुती केली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन तो मुलांपर्यंत भारतीय संस्कृती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे असे एका चाहत्याने म्हटले आहे, तर दुसऱ्या चाहत्याने अल्लू अर्जुन मातीशी जोडलेला आहे असे म्हटले आहे.

‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला खूप लोकप्रियता मिळाली. याचा सिक्वल ‘पुष्पा: द रुल’ काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या अल्लू अर्जुन याच चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये गुंतलेला आहे.